स्टंट करण्याच्या नादात तोंडावर आपटला, व्हिडीओ पाहून नेटकरी हादरले, पाहा धक्कादायक Video

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा बाईकवर स्टंट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओची सुरुवात पाहून पुढच्याच क्षणी त्या मुलासोबत काही वाईट होणार आहे असं वाटतंही नाही.

स्टंट करण्याच्या नादात तोंडावर आपटला, व्हिडीओ पाहून नेटकरी हादरले, पाहा धक्कादायक Video
बाईकवर स्टंट करण्याच्या नादात अपघात

‘सोशल मीडियाचं जग’ही अप्रतिम आहे. दररोज एकापेक्षा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. काही लोक त्यांच्या व्हिडिओ आणि फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. एका मुलाला बाईकवर स्टंट करणं किती महागात पडलं ते यातून कळेल. व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हीही म्हणाल की सर्व हिरोपंती जीवावर आली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा बाईकवर स्टंट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओची सुरुवात पाहून पुढच्याच क्षणी त्या मुलासोबत काही वाईट होणार आहे असं वाटतंही नाही. हा मुलगा बाईक अगदी आरामात हवेत उचलून स्टंट करताना दिसत आहे. पण काही सेकंदांनंतर समोर येणारी दृश्यं खरोखरच भितीदायक आहे. दुचाकीवर उभे राहिल्याने मुलाचे संतुलन बिघडले आणि तो रस्त्यावर तोंडावर आपटला.

चला हा व्हिडिओ पाहूया.

View this post on Instagram

A post shared by Rapid DP 🔥 (@rapiddenny)

इन्स्टाग्रामवर रॅपिडेंनी नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कॅप्शन देत युजरने लिहिले की, ‘हेल्मेट घालणं किती महत्त्वाचे आहे, हे व्हिडीओमध्ये पाहा. सध्या हा मुलगा एकदम ठीक आहे.’ 26 नोव्हेंबरला शेअर केलेल्या या व्हिडिओला जवळपास 15 हजार लोकांनी लाईक केले आहे.

मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी रायडरबाबत चिंता व्यक्त केली आहे. स्टंट करताना तो ज्या पद्धतीने रस्त्यावर पडला आणि रस्त्यावर फरफटला गेला, त्यामुळे त्याचे काय झाले असेल, असं लोक विचारत आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, तुम्ही हेल्मेट घालायला सुरुवात केली तरी चालेल पण अशी चूक कधीच करू नका. शक्य असल्यास असे जीवघेणे स्टंट करू नका.

त्याचबरोबर हा स्टंट व्हिडिओ पाहून काही लोक संतापले आहेत. देवाने तुम्हाला मेंदूही दिला आहे, असे लोक म्हणतात. असे मूर्खपणाचे काम करण्यापूर्वी तुमच्या मेंदूचा वापर करा. त्याचवेळी एका युजरने ‘ह्याला हॉस्पिटलला जाण्यासाठी केलेला जुगाड म्हणतात’ अशी टोमणाही मारला आहे.

हेही पाहा:

Video: ज्या बेबी ट्रॉली लोकांना बाळ आहे असं वाटत होतं, ते काही वेगळंच निघालं, प्रँक व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

Viral Video: चिमुरड्याने बकरीच्या करडाला लाथ घातली, त्यानंतर जे झालं, ते हा चिमुरडा कधीही विसरणार नाही!

Published On - 2:10 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI