Viral Video: चिमुरड्याने बकरीच्या करडाला लाथ घातली, त्यानंतर जे झालं, ते हा चिमुरडा कधीही विसरणार नाही!

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी शेळीला दोरीने बांधलेलं आहे, तेवढ्या पॅन्ट आणि टी-शर्ट घातलेला एक लहान मुलगा तिथं येतो आणि बकरीच्या पायाला मागून लाथ मारतो.

Viral Video: चिमुरड्याने बकरीच्या करडाला लाथ घातली, त्यानंतर जे झालं, ते हा चिमुरडा कधीही विसरणार नाही!
चिमुरड्याने बकरीच्या करडाला लाथ मारली, आणि त्यानंतर...

सोशल मीडिया मजेदार व्हिडिओंनी भरलेला आहे. फेसबुकपासून ते इंस्टाग्राम आणि ट्विटरपर्यंत व्हायरल व्हिडिओंचा महापूर आला आहे. बऱ्याचदा असे व्हिडिओ इथे व्हायरल होतात, जे लोकांचे खूप मनोरंजन करतात आणि काही खूप आश्चर्यकारक देखील असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य तर वाटेलच पण तो पाहून तुम्हालाही हसू येईल. हा व्हिडीओ एका लहान गोंडस मुलाचा आणि बकरीचा आहे, ज्यामध्ये मुल बकरीला त्रास देताना दिसत आहे, पण ही बकरी चिमुरड्याला धडाही शिकवते आहे. हा धडा असा आहे की, आता मूल देखील एखाद्या प्राण्याला त्रास देण्यापूर्वी 100 वेळा विचार करेल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी शेळीला दोरीने बांधलेलं आहे, तेवढ्या पॅन्ट आणि टी-शर्ट घातलेला एक लहान मुलगा तिथं येतो आणि बकरीच्या पायाला मागून लाथ मारतो. मग काय, बकरी चिडते आणि रागाने ती या चिमुरड्याला शिंगाने मारते. त्यामुळं हा चिमुरडा जागीच पडतो.

व्हिडीओ पाहा:

हा एक अतिशय मजेदार व्हिडिओ आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत आणि ते हसत-हसत आहेत. हा व्हिडिओ लोकांना किती आवडला आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर 1900 हून अधिक लोकांनी पोस्टला लाईक केले आहे आणि लोकांनी कमेंटमध्ये हसून इमोजीही शेअर केले आहेत.

हा व्हिडिओ najar_singh_1322 या अकाऊंटवरुन इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू येत असेल, पण यातून एक धडाही घेता येईल आणि तो म्हणजे कोणत्याही निष्पाप प्राण्याला विनाकारण मारु नये. तेही माणसांसारखे प्रेमाचे भुकेले आहेत. जर तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागलात तर तेही तुमच्यासोबत राहतील. त्यामुळे मुलांनाही सांगा, कोणत्याही वन्य प्राण्याला कधीही मारू नका, तर प्रेमाने वागवा.

हेही पाहा:

Video: आईस्क्रिम प्रँक करणाऱ्याला चिमुरड्याचं भन्नाट उत्तर, नेटकरी म्हणाले, चिमुरड्याचा स्वॅग भारीय!

Video: कावळ्याच्या शहाणपण सिद्ध करणारा व्हिडीओ, लोक म्हणाले, कावळ्याला माणसाने उगाच बदनाम केलंय!

 

Published On - 1:15 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI