Video: आईस्क्रिम प्रँक करणाऱ्याला चिमुरड्याचं भन्नाट उत्तर, नेटकरी म्हणाले, चिमुरड्याचा स्वॅग भारीय!

जेव्हा मुलाने आईस्क्रीम घेण्यासाठी हात पुढे केला तेव्हा आईस्क्रीमवाला आयस्क्रिम अचानक मागे खेचतो आणि मुलाच्या हातात फक्त आईस्क्रीम कोन उरतो. आईस्क्रीम प्रँक करणार्‍या व्यक्तीच्या या कृतीने मुलाला राग येतो आणि तो लगेचच रागाच्या भरात...

Video: आईस्क्रिम प्रँक करणाऱ्याला चिमुरड्याचं भन्नाट उत्तर, नेटकरी म्हणाले, चिमुरड्याचा स्वॅग भारीय!
लहान मुलाचा प्रँक करणं आईस्क्रिमवाल्याला महागात

आईस्क्रीम खायला कुणाला आवडत नाही? लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रिमचे अनेक दिवाने आहेत. उन्हाळ्यात तर लोक आईसक्रीम अगदी मनसोक्त खातात, पण आता हिवाळ्याचा ऋतू आहे, तेव्हा तुम्हाला रस्त्यावर आईस्क्रीम खाताना मोजकेच लोक दिसतील. पण आयस्क्रिम लव्हरला ऋतूशी काही देणं घेणं नसतं. कधीकधी आईस्क्रीमशी संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे खूपच मजेदार असतात. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मूल आईस्क्रीम घेण्यासाठी गेलं होतं, पण आईस्क्रीमवाला त्याच्यासोबत प्रँक करायला लागला. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल. (Funny Video Viral of a little boy angry because of not getting ice cream Amazing Video)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आईस्क्रीमच्या दुकानासमोर एक लहान मुल उभे आहे, तेव्हा पलीकडून आईस्क्रीमवाले तुर्की शैलीत युक्ती करत आईस्क्रीम मुलाकडे देत आहे. पण जेव्हा मुलाने आईस्क्रीम घेण्यासाठी हात पुढे केला तेव्हा आईस्क्रीमवाला आयस्क्रिम अचानक मागे खेचतो आणि मुलाच्या हातात फक्त आईस्क्रीम कोन उरतो. आईस्क्रीम प्रँक करणार्‍या व्यक्तीच्या या कृतीने मुलाला राग येतो आणि तो लगेचच रागाच्या भरात, आयस्क्रिम कोन जमिनीवर आपटतो आणि त्याच्या पायाने चिरडतो. लहान मुलाचा हा गोंडस व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. त्याने ज्या पद्धतीने आईस्क्रीम करणाऱ्या व्यक्तीवर आपला राग काढला आहे, तो लोकांना आवडला आहे.

व्हिडीओ पाहा:

हा गोंडस छोटा व्हिडीओ कुठे शूट करण्यात आला आहे हे माहीत नाही, मात्र तो इन्स्टाग्रामवर cute_baby_reel या नावाने शेअर करण्यात आला असून, ‘पुन्हा जोक करू नकोस’ असं लिहिले आहे. लोकांना हा व्हिडिओ किती आवडला आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, आतापर्यंत 2 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर 14 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी देखील अलीकडेच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर असाच एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये एक आईस्क्रीम करणारा माणूस एका मुलीला पराक्रमाद्वारे त्रास देताना दिसत आहे, परंतु मुलीने त्याला मजेदार पद्धतीने धडाही शिकवला आहे. ती आईस्क्रीमवरून लक्ष हटवते आणि संगीतावर नाचू लागते. व्हिडिओ शेअर करताना अवनीश शरणने ‘आणि मुलांना त्रास देऊ नका’ असे मजेदार कॅप्शनही लिहिले आहे. खरं तर, मुलांचे असे सर्व व्हिडिओ खूप गोंडस असतात आणि लोकांना ते खूप आवडतात.

हेही पाहा:

Video: मगरींनी भरलेल्या हौदात माकडाचं पिल्लू पडलं, मगरी पिल्लाला खाणार, तितक्यात…पाहा धक्कादायक व्हिडीओ!

Video: भल्यामोठ्या झोपाळ्यावर तरुणाचे स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला जीव जास्त झालाय वाटतं!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI