Video: मगरींनी भरलेल्या हौदात माकडाचं पिल्लू पडलं, मगरी पिल्लाला खाणार, तितक्यात…पाहा धक्कादायक व्हिडीओ!

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या काँक्रीटच्या टबमध्ये पाणी आहे आणि त्यात अनेक मगरी पोहत आहेत आणि एका किनाऱ्यावर माकडाचे पिल्लू शांत बसले आहे आणि बाहेर पडण्याचा विचार करत आहे.

Video: मगरींनी भरलेल्या हौदात माकडाचं पिल्लू पडलं, मगरी पिल्लाला खाणार, तितक्यात...पाहा धक्कादायक व्हिडीओ!
मगरीच्या कचाट्यात अडकलेलं माकडाचं पिल्लू

मगरी दिसायलाच शांत असतात, पण त्या पृथ्वीवरील सर्वात घातक प्राण्यांपैकी एक आहेत. दुसऱ्या बाजूला माकडंही जंगलातील सर्वाधिक करामती प्राण्यांपैकी एक आहेत. दिवसभर ते काही ना काही गोंधळ घालतच असतात. मात्र, या करामती त्यांच्या जीवावर येतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जरा कल्पना करा की, जर एखादा माणूस किंवा प्राणी मोठमोठ्या मगरींच्या जाळ्यात अडकला तर ते त्यांचे काय हाल करतील. असा विचार करूनच मनात भीती निर्माण होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माकडाचे पिल्लू मगरींच्या विळख्यात अडकले आहे. कदाचित उडी मारताना तो या पाण्यात पडला असावा.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या काँक्रीटच्या टबमध्ये पाणी आहे आणि त्यात अनेक मगरी पोहत आहेत आणि एका किनाऱ्यावर माकडाचे पिल्लू शांत बसले आहे आणि बाहेर पडण्याचा विचार करत आहे. मात्र, टबच्या भिंतीवर तीन माकडे बसली आहेत आणि त्यातील एक लहान माकडाला टबमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान मगरींचा कळप त्या लहान माकडाकडे टक लावून पाहतो की, ते कधी त्याला पकडून खातात. पण तेवढ्यात काहीतरी वेगळे होतं.

टबच्या भिंतीवर बसलेल्या एका मोठ्या माकडाने त्या लहान माकडाचा हात पकडून वर ओढला आणि त्याचा जीव वाचवला. ती कदाचित त्याची आई असेल आणि तुम्हाला माहित असेल की आई आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काहीही करते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की ते लहान माकड सुद्धा त्या मोठ्या माकडाला कसे चिकटून बसले आहे, त्यांना पाहून असे म्हणता येईल की ती नक्कीच त्याची आई असेल.

व्हिडीओ पाहा:

इन्स्टाग्रामवर yourenaturegram नावाच्या आयडीवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडिओला आतापर्यंत 3 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 1 लाखांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे.

हेही पाहा:

Video: भल्यामोठ्या झोपाळ्यावर तरुणाचे स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला जीव जास्त झालाय वाटतं!

Video: 9 वर्षाच्या चिमुरड्याचं पराठे बनवण्याचं कौशल्य पाहा, लोक म्हणाले, याच्यापुढे 5 स्टारचे शेफही पाणी भरतील!

Published On - 4:09 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI