Video: 9 वर्षाच्या चिमुरड्याचं पराठे बनवण्याचं कौशल्य पाहा, लोक म्हणाले, याच्यापुढे 5 स्टारचे शेफही पाणी भरतील!

9 वर्षांच्या मुलाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. फूड ब्लॉगर विशालने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 23 नोव्हेंबर रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 16 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

Video: 9 वर्षाच्या चिमुरड्याचं पराठे बनवण्याचं कौशल्य पाहा, लोक म्हणाले, याच्यापुढे 5 स्टारचे शेफही पाणी भरतील!
पराठे बनवणारा चिमुरडा

आजच्या युगात सोशल मीडिया हा कलागुणांना वाव देण्याचं सर्वात मोठं माध्यम आहे. इथं व्हिडीओ पडल्यानंतर कुणाचे नशीब कधी उजळेल, काही सांगता येत नाही. ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांना तुम्ही ओळखत असालच. तेही असेच रात्रीत स्टार झाले. सध्या फरिदाबादच्या अशाच एका गरीब कुटुंबातील मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलाचे पराठे बनण्याचे कौशल्य पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, चांगले शेफही याच्यासमोर पाणी भरतील. सध्या मुलाचा हा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे.

9 वर्षांच्या मुलाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. फूड ब्लॉगर विशालने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 23 नोव्हेंबर रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 16 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, या व्हिडिओमधील मुलाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. हे चिमुरडा हरियाणातील फरिदाबादचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा चिमुरडा एका मोठ्या तव्यावर पराठे बनवताना दिसत आहे. हा ज्या पद्धतीने पराठा उलटा बेक करतो, ते पाहून तुम्हाला प्रोफेशनल शेफ वाटेल. मात्र, व्हिडीओची सुरुवात पाहता हा मुलगा कॅमेरा पाहून घाबरून गेल्याचं दिसतं. म्हणूनच तो ब्लॉगरला तिथून दूर जाण्याचा संकेत देतो. मात्र, ब्लॉगर व्हिडीओ बनवणं सुरुच ठेवतो. या मुलाच्या कौशल्याचं सगळे कौतुक करत आहेत.

व्हिडीओ पाहा:

तरीही काही यूजर्सही या मुलाच्या भविष्याची चिंता व्यक्त करत आहेत. कारण त्याचं हे वय वाचायचं, लिहायचं आणि खेळायचं. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला हा काम करावं लागतंय.

काही दिवसांपूर्वी फरीदाबादमधील एका 13 वर्षीय मुलाचा चायनीज खाद्यपदार्थ विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर त्याची प्रतिभा पाहून काही लोक त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढे आले होते.

हेही पाहा:

Video: आग लगे चाहे बस्ती में, बाबा तो रहता मस्ती में, भिवंडीत मांडवाला आग, पण भावांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन मटणावर!

Video: आफ्रिकेतील जोडप्याच्या तोंडी बॉलीवूडचे बोल, लोक म्हणाले, हे जोडपं खूप क्युट आहे!

Published On - 1:46 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI