Video: आग लगे चाहे बस्ती में, बाबा तो रहता मस्ती में, भिवंडीत मांडवाला आग, पण भावांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन मटणावर!

एकीकडे एवढा सगळा राडा होत असताना, लग्न मंडपात हे तरुण आरामात मटणावर ताव मारत होते, त्यांना आगीशी काही देणं घेणं नसल्याचं दिसत होतं, त्यामुळे नेटकरी यावर पोट धरुन हसत आहेत.

Video: आग लगे चाहे बस्ती में, बाबा तो रहता मस्ती में, भिवंडीत मांडवाला आग, पण भावांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन  मटणावर!
लग्नमंडपाला आग, तरीही मटण खाण्यात मग्न तरुण

सोशल मीडिया असा मंच झाला आहे, जिथं कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. मोबाईलवर व्हिडीओ काढला की अपलोड होतो, आणि ज्या गोष्टी एरवी समजणारही नाही त्या जगासमोर येतात. असाच काहीसा प्रकार भिवंडीत पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये मांडवाला आग लागलेली असतानाही, तरुण मटणावर ताव मारताना मग्न दिस आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्न मंडपात काही तरुण टेबल-खुर्चीवर बसून जेवत आहे, त्यांच्या समोर मटणाचे विविध पदार्थ ठेवलेले आहे, आणि ते त्यावर मनमुराद ताव मारत आहेत, पण अगदी याच व्हिडीओच्या मागे आपण पाहू शकतो की, लग्नमंडप पेटला आहे, लोकांची आरडाओरड सुरु आहे, पण या भावांना त्याचं काही देणं-घेणं दिसत नाही, त्यांना दिसतं आहे ते केवळ समोर ठेवलेलं मटण. हा व्हिडीओ पाहून, नेटकरी पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही

व्हिडीओ पाहा:

भिवंडीत 29 नोव्हेंबरला रात्री ही आगीची घटना घडली. इथल्या अंसारी मॅरेज हॉलला रात्री आग लागली. आग लागल्यानंतर याची माहिती तातडीने मनपाला देण्यात आली, आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहचल्या, ज्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन ही आग विझवली. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत मॅरेज हॉलचं मोठं नुकसान झालं आहे, या आगीत लग्नातील शोभेच्या सगळ्या वस्तू, खुर्च्या जळून खाक झाल्या. शिवाय, हॉलशेजारी उभ्या असणाऱ्या 6 गाड्या जळून खाक झाल्या. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी ही आग लग्नात वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे लागल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मात्र, एकीकडे एवढा सगळा राडा होत असताना, लग्न मंडपात हे तरुण आरामात मटणावर ताव मारत होते, त्यांना आगीशी काही देणं घेणं नसल्याचं दिसत होतं, त्यामुळे नेटकरी यावर पोट धरुन हसत आहेत.

हेही पाहा:

Video: आफ्रिकेतील जोडप्याच्या तोंडी बॉलीवूडचे बोल, लोक म्हणाले, हे जोडपं खूप क्युट आहे!

Video : कॅडबरीची जाहिरात करणारा चटपट, व्हिडीओ पाहून नेटकरी चिमुरड्या चटपटच्या क्युटनेसचे फॅन

 

Published On - 12:05 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI