Video: भल्यामोठ्या झोपाळ्यावर तरुणाचे स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला जीव जास्त झालाय वाटतं!

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस या झोपाळ्यावर स्वार होत त्याच्याशी स्पर्धा करत आहे. हा स्विंग सामान्य स्विंग्सपेक्षा थोडा वेगळा आहे, कारण त्यात जास्त बसण्याची जागा नाही.

Video: भल्यामोठ्या झोपाळ्यावर तरुणाचे स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला जीव जास्त झालाय वाटतं!
झोपाळ्यावर स्टंट करणारा व्यक्ती

लहानपणी तुम्ही जत्रेला गेला असाल आणि आजही अधूनमधून जात असाल. जत्रेतील आकर्षणाचे केंद्र म्हणजे उंच झोपाळा. उंचच उंच झोके पाहून प्रत्येकाचे मन त्यावर डोलायला लागते. तुम्ही कधी या झोपाळ्यावर बसला असाल तर तुम्हाला आठवत असेल की जेव्हा हा वरच्या दिशेने जायचा आणि नंतर वरून खाली आल्यावर खूप भीती वाटायची, धाप लागायची. पण जरा कल्पना करा की एखादी व्यक्ती या झोपाळ्याच्या वर उभी राहून त्यावर चालायला लागली तर किती धक्कादायक दृश्य असेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस या झोपाळ्यावर स्वार होत त्याच्याशी स्पर्धा करत आहे. हा स्विंग सामान्य स्विंग्सपेक्षा थोडा वेगळा आहे, कारण त्यात जास्त बसण्याची जागा नाही. जणू काही त्या व्यक्तीने आपला पराक्रम दाखवण्यासाठीच तो अनोखा स्विंग तयार केला आहे. ती व्यक्ती गोल स्विंगवर आरामात चालत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो झोपाळा अखंडपणे वेगाने फिरत आहे, पण ती व्यक्ती बिनधास्तपणे चालत लोकांना आश्चर्यचकीत करत आहे. यादरम्यान, त्याच्या हातात दोरीसारखे काहीतरी दिसत आहे.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडीओ खरोखरच आश्चर्यकारक आहे, कारण या स्विंगवर बसणे सर्वसामान्यांना भीतीदायक वाटत असताना, ही व्यक्ती त्यावर उभं राहून चालताना कसरती करत आहे. यादरम्यान खाली काही लोक बसले आहेत, जे त्यांचा हा अनोखा पराक्रम पाहण्याचा आनंद घेत आहेत. हा व्हिडीओ एखाद्या जत्रेतील वाटतो, पण तो कुठला आहे याविषयी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ब्यूटिफुलग्राम नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर आतापर्यंत 82 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

हेही पाहा:

Video: 9 वर्षाच्या चिमुरड्याचं पराठे बनवण्याचं कौशल्य पाहा, लोक म्हणाले, याच्यापुढे 5 स्टारचे शेफही पाणी भरतील!

Video: आग लगे चाहे बस्ती में, बाबा तो रहता मस्ती में, भिवंडीत मांडवाला आग, पण भावांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन मटणावर!

 

Published On - 3:56 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI