Video: कावळ्याच्या शहाणपण सिद्ध करणारा व्हिडीओ, लोक म्हणाले, कावळ्याला माणसाने उगाच बदनाम केलंय!

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की खोलीतील एक व्यक्ती या कावळ्यासमोर काही रंगीबेरंगी बॉक्स ठेवत आहे. हे बॉक्स एकमेकांपेक्षा आकाराने लहान आहेत. तुम्ही बघू शकता, कावळा प्रत्येक लहान पेटीला त्याच्या आकारानुसार अगदी मोठ्या पेटीत ठेवताना दिसतो.

Video: कावळ्याच्या शहाणपण सिद्ध करणारा व्हिडीओ, लोक म्हणाले, कावळ्याला माणसाने उगाच बदनाम केलंय!
हुशार कावळ्याचा व्हिडीओ

लहानपणी कावळ्याच्या हुशारी आणि धूर्तपणाच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या आणि वाचल्या असतील. त्यात खडे भरलेल्या मडक्यातून पाणी काढण्याची तर प्रत्येकाला माहित असेल. आता कावळ्याची हुशारी सिद्ध करणारा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये कावळा असे काही करताना दिसतो, ज्यामध्ये मेंदूची म्हणजेच बुद्धीची गरज असते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, हा कावळा खरंच शहाणा आहे. (Amazning Viral Video of Black Crow video goes viral on social media netizens shocked)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कावळा आपल्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की खोलीतील एक व्यक्ती या कावळ्यासमोर काही रंगीबेरंगी बॉक्स ठेवत आहे. हे बॉक्स एकमेकांपेक्षा आकाराने लहान आहेत. तुम्ही बघू शकता, कावळा प्रत्येक लहान पेटीला त्याच्या आकारानुसार अगदी मोठ्या पेटीत ठेवताना दिसतो. व्हिडिओच्या शेवटी, तो सर्व बॉक्स एकत्र ठेवतो. हे खरोखरच थक्क करणारं आहे. कारण सहसा मुलांना हे करायला शिकवले जाते. पण या कावळ्याला हे करायला कोणी शिकवलं असेल, असा प्रश्न पडतो.

चला तर मग हा व्हिडिओ पाहूया.

स्मार्ट कावळ्यांचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 9gag नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लोकांना या व्हिडिओला किती पसंती मिळत आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, दोन दिवसांत याला 61 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सही जोरदार प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘मला विश्वासच बसत नाही की हा काळा कावळा इतका हुशार असू शकतो. त्याचवेळी, एका यूजरने प्रश्न विचारताना लिहिले आहे की, तो इतका बुद्धिमान कसा झाला असेल? त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, ‘मला कळत नाही की लोक कावळ्याकडे इतक्या वाईट नजरेने का पाहतात, हा तर इतका हुशार पक्षी आहे.’

हेही पाहा:

Video: मगरींनी भरलेल्या हौदात माकडाचं पिल्लू पडलं, मगरी पिल्लाला खाणार, तितक्यात…पाहा धक्कादायक व्हिडीओ!

Video: भल्यामोठ्या झोपाळ्यावर तरुणाचे स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला जीव जास्त झालाय वाटतं!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI