Video: ज्या बेबी ट्रॉली लोकांना बाळ आहे असं वाटत होतं, ते काही वेगळंच निघालं, प्रँक व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या प्रँक व्हिडिओमध्ये, एक मुलगा रस्त्यावर प्रॅम म्हणजेच लहान मुलांना फिरवण्याची ट्रॉली घेऊन जाताना दिसत आहे. गंमत म्हणजे प्राममध्ये कुठलाही मुलगा नाहीय, त्याने केलेला प्रँक कुणालाही समजे नये म्हणून या मुलाने प्रॅमला कपड्याने झाकले आहे.

Video: ज्या बेबी ट्रॉली लोकांना बाळ आहे असं वाटत होतं, ते काही वेगळंच निघालं, प्रँक व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट
प्रँक व्हिडीओ

प्रँक हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात पहिली गोष्ट येईल ती म्हणजे लोकांच्या विचित्र प्रकारे केलेल्या चेष्टा. खरं म्हणजे, प्रँक करुन लोकांना हसवण्याचं काम केलं जातं. जे व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होत असतात. याच कारणामुळे तुम्हाला सोशल मीडियावर एकापेक्षा एक प्रँक व्हिडिओ पाहायला मिळतील. यातील काही धक्कादायक आहेत, काही भयावह आहेत. तर, प्रत्येकाचा शेवट आनंदी आहे. सध्या सोशल मीडियावर एक मजेदार प्रॅम प्रँक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो लोकांना खूप आवडतो. हा प्रँक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही नक्कीच हसू येईल.

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या प्रँक व्हिडिओमध्ये, एक मुलगा रस्त्यावर प्रॅम म्हणजेच लहान मुलांना फिरवण्याची ट्रॉली घेऊन जाताना दिसत आहे. गंमत म्हणजे प्राममध्ये कुठलाही मुलगा नाहीय, त्याने केलेला प्रँक कुणालाही समजे नये म्हणून या मुलाने प्रॅमला कपड्याने झाकले आहे. यानंतर, तो मुलगा रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका महिलेकडे जातो आणि तिला काही वेळ प्रॅम पाहण्यास सांगतो आणि तिथून निघून जातो. बराच वेळ मुलगा येत नाही, तेव्हा ती बाई प्रॅममध्ये डोकावू लागते. यानंतर काय होते ते पाहून तुम्हाला हसू आवारणार नाही.

चला तर मग पाहूया हा मजेदार प्रँक व्हिडिओ.

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

हा अतिशय मजेदार प्रँक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘इथं एक नंबर जोक पाहा.’ लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत सुमारे 11 हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेक युजर्सने इमोटिकॉनद्वारे त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.

पण तरीही अनेक युजर्सने प्रँक व्हिडिओंबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक संतापले आहेत. एका युजरवर कमेंट करताना लिहिले की, ‘अशा कृत्यांमुळे लोकांना हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. भाऊ, जरा विचार करा.” त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘मला त्या बिचाऱ्या मुलीबद्दल वाईट वाटते.’

हेही पाहा:

Viral Video: चिमुरड्याने बकरीच्या करडाला लाथ घातली, त्यानंतर जे झालं, ते हा चिमुरडा कधीही विसरणार नाही!

Video: आईस्क्रिम प्रँक करणाऱ्याला चिमुरड्याचं भन्नाट उत्तर, नेटकरी म्हणाले, चिमुरड्याचा स्वॅग भारीय!

 

Published On - 1:56 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI