Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची ती भविष्यवाणी, चीनला का लागला घोर? तिबेट खरंच हातचं जाणार?

Baba Vanga Prediction : बाबा वेंगा हिच्या भाकितानुसार, इस्त्राईल आणि गाझा पट्टीत हमासमधील युद्ध हे तिसर्‍या महायुद्धाची नांदी आहे. युरोपमधील अणू प्रकल्पावर हल्ले होतील. तर चीन युरोपपर्यंत धडक मारेल. पण त्यापूर्वी चीनला मोठा फटका बसेल. काय आहे ती भविष्यवाणी?

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची ती भविष्यवाणी, चीनला का लागला घोर? तिबेट खरंच हातचं जाणार?
बाबा वेंगा हिची ती भविष्यवाणी
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 27, 2025 | 3:29 PM

Baba Vanga on China : बल्गेरियाची भविष्यवेत्ता बाबा वेंगा ही अचूक भाकि‍तासाठी ओळखली जाते. तिने यापूर्वी सोव्हिएत संघाच्या विघटनापासून ते अमेरिकेत 9/11 हल्ल्यापर्यंतची भविष्यवाणी केली होती. ती पुढे खरी ठरली. त्यानंतर जगातील विद्वान तिच्या गूढ काव्याकडे वळले. तिने जागतिक तिसरे युद्ध, रशिया, युरोप आणि चीन यांच्यासह तिबेट या शेजारील देशाविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. या भाकि‍तामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या पायाखालची जमीन सरकेल.

जगभरात होतील 70 अणुस्फोट

बाबा वेंगाच्या भाकितानुसार, जगभरात भीषण युद्ध होईल. एक वर्ष जणू पृथ्वी होरपळून निघेल. जगभरात धुक्याचे साम्राज्य असेल. अशीच भविष्यवाणी फ्रान्सचे लोकप्रिय भविष्यवेत्ते नास्त्रेदमस (Nostradamus) यांनी पण केली आहे. जगभरात 70 अणुस्फोट होतील, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. धूराचे आणि धुक्याचे इतके दाट लोट असतील की सूर्य सुद्धा दिसणार नाही, असे भाकीत या दोघांनी केले.

रशिया आणि चीनचा युरोपवर हल्ला

तिसर्‍या जागतिक युद्धा दरम्यान तिबेटला स्वातंत्र्य मिळण्याचा दावा बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस या दोघांनी केले आहे. तर रशिया आणि चीन हे दोन्ही देश युरोपावर हल्ला करतील असे भविष्य या दोघांनी व्यक्त केले आहे. तिसर्‍या महायुद्धाचे मूळ कारण इस्त्रायल आणि हमासच्या युद्धात असल्याचा दावा दोघांनी केला आहे. नास्त्रेदमस याने त्याच्या जगप्रसिद्ध दे सेंचुरीज या पुस्तकात रशिया आणि चीन युरोपच्या अणूशक्ती केंद्रावर हल्ला चढवतील. दोघांचे लष्कर युरोपातील अनेक शहर ताब्यात घेतील असे भविष्य केले आहे. तर याच दरम्यान तिबेट स्वतंत्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा भारताच्या आश्रयाला आहेत. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे त्यांचा मठ आहे.

डिस्क्लेमर : या दाव्यांबद्दल पुरेशी आणि ठोस पुरावे किंवा अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही. बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.