
प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा बिग्सने जगाला पुढील संकटाची चाहुल दिली आहे. त्यांच्या मते, जगाचा सामना एका विनाशकारी भूंकपाशी होईल. रशियन द्वीपसमूहात एक भूकंप आला. ज्वालामुखी जिवंत झाला. त्या पार्श्वभूमीवर बिग्सच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे. बाबा बिग्सचा दावा आहे की देवाने त्याला याविषयीचे संकेत दिले आहे. त्याने भूकंप आणि त्यातून होणारा विनाश दृष्टीपटलावर पाहिला. त्याने पुढील संकटाचे भाकीत केले आहे. त्याच्या नवीन भाकीताने जगात खळबळ उडाली आहे.
न्यू मॅड्रिड फॉल्ट लाईनवर भूकंप
बाबा बिग्सच्या मते, भूकंप जपान, रशियाजवळ नाही तर अमेरिकेत होईल. न्यू मॅड्रिड फॉल्ट लाईन भूकंपाने हादरेल. मिसूरी, अर्कांसास, टेनेसी, केंटकी आणि इलिनॉयस राज्यासह इतर देशाना त्याचे हादरे जाणवतील. हा भूकंप 6.5 तीव्रतेचा असेल. या भूकंपात 1800 लोकांहून अधिक जण प्राण गमावतील असे भाकीत बिग्सने केले आहे.
मिसिसिपी नदीचा मार्गच बदलेल
बाबा बिग्सने भाकीत केले आहे की, हा महाभूकंप असेल. तो इतका शक्तिशाली असेल की त्यामुळे मिसिसिपी नदीचा प्रवाह बदलेल. नदीचा मार्गच बदलून जाईल. तर वसंत ऋतूत म्हणजे फेब्रुवारीनंतर हा भूकंप होण्याची भीती आहे. या महाभूकंपामुळे अमेरिकेतील अनेक राज्यांना मोठा हादरा बसेल. अनेक ठिकाणी मोठे नुकसान होईल, अशी शक्यता आहे.
ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचे भाकीत ठरले खरे
राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यात येईल. त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात येईल असे भाकीत बाबा बिग्सने यापूर्वीच केले होते. त्यानंतर निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्या कानाला चाटून गोळी गेली. त्यात ते बालंबाल बचावले. त्यामुळे बिग्सच्या सध्याच्या भाकीताने अनेकांना चिंतेत टाकले आहे. नास्त्रेदमस आणि बाबा वेंगा यांनी वर्ष 2025 च्या अखेरीस मानव जातीसमोर मोठी संकटं येण्याची भीती व्यक्त केली आहे. यामध्ये नैसर्गिक संकटांसह मानवी युद्धाचे भाकीत व्यक्त केले आहे. बाबा वेंगाने सुद्धा अमेरिकेच्या पश्चिमी राज्यात विनाशकारी घटनांची भविष्यवाणी केली आहे.
डिस्क्लेमर : बाब बिग्सचे भाकीत विविध उपलब्ध माहितीच्या स्त्रोतांआधारे देण्यात आले आहे. त्याला टीव्ही 9 चा दुजोरा नाही.