
वांगेलिया पांडेवा दिमित्रोवा उर्फ बाबा वेंगाने अनेक भाकीतं केली आहेत. तिने 2028 साठी पण काही भाकीतं केली आहेत. तिने दावा केला आहे की, 900 दिवसांनी जगातून उपासमार कायमची हद्दपार होईल. मानव नवीन ऊर्जेचा शोध लावले. त्यामुळे जगातून ऊर्जेचे पारंपरिक स्त्रोत कमी होतील आणि हा नवीन ऊर्जा स्त्रोत जगाला प्रकाशमान करेल. यामध्ये न्युक्लिअर फ्यूजन, हायड्रोजन ऊर्जा अथवा क्वांटम बॅटरी असा पर्याय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या भाकितानुसार, मानव मंगळानंतर शुक्र ग्रहावर जीवनाचा शोध घेईल. हा ग्रह मानवाला खुणावत आहे.
तो नवीन ऊर्जेचा स्त्रोत कोणता?
बाबा वेंगाच्या मते मानव 2028 पर्यंत नवीन ऊर्जा स्त्रोताचा शोध लावले. फॉस्फीन वायूला संभाव्य जैविक इंधन मानले जाते. फॉस्फीन वायू (Phosphine gas) म्हणजे PH₃ हे रासायनिक सूत्र असलेला एक रंगहीन, ज्वलनशील आणि विषारी वायू आहे. तो ऊर्जेचा नवीन स्त्रोत म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे अनंतकाळासाठी ऊर्जेची गरज हा फॉस्फीन वायू भागवू शकेल.
शुक्रावर मोहीम कशासाठी?
मंगळानंतर मानवाला मंगळ ग्रह खुणावत आहे. शुक्र ग्रहावर फॉस्फीन वायुचे साठे असल्याचा दावा करण्यात येत आहे. 2028 साठी कोणत्याच देशाने अंतराळ मोहीम जाहीर केलेली नाही. NASA च्या DAVINCI+ आणि VERITAS, तसेच ESA ची EnVision या शुक्र ग्रहावरील मोहिमा 2030 च्या आसपास होतील.
बाबा वेंगाच्या इतर भविष्यवाणी
बाबा वेंगाने अशा इतर ही अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यानुसार, 2025 पर्यंत युरोप हा विविध गटा तटात विखुरला जाईल. 2033 मध्ये वायु प्रदूषणामुळे समुद्राचा स्तर उंचावेल. त्यात काही देश बुडतील. काही देशांतील मोठी शहरं बुडतील. 2043 मध्ये युरोपातील अनेक देशात इस्लामिक लोकांच्या हाती सत्ता येईल. 2046 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मानवी अंगाची निर्मिती करण्यात येईल.
डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.