Video | ‘ओह.. हो.. हो… !’ पहिल्यांदा पिझ्झा चाखल्यानंतर तिनं जे केलं, ते शब्दांच्या पलिकडचंय

Video | 'ओह.. हो.. हो... !' पहिल्यांदा पिझ्झा चाखल्यानंतर तिनं जे केलं, ते शब्दांच्या पलिकडचंय
पहिल्यांदाच पिझ्झा चाखणारी गोंडस मुलगी

साखरेपेक्षाही गोड आणि गोंडसपेक्षाही क्यूट आणि ब्युटीफूलपेक्षाही विलक्षण सुंदर अशी रिऍक्शन दिलेली ही चिमुरडी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 03, 2022 | 8:41 PM

पिझ्झा, हा एक असा पदार्थ आहे, ज्याचे क्वचितच शत्रू शोधून सापडतील. पिझ्झा सगळ्यांना आवडतोच, असं काही नाहीये. पण तरीही बहुतांश लोक पिझ्झाचे चाहते आहेतच. पिझ्झा आवडत नाही, असे लोक फार थोडे आहेत. पिझ्झा खाणाऱ्यांचं पिझ्झा प्रेम ही एक स्वतंत्र प्रबंध लिहायची गोष्ट आहे, हे मान्य! पण एका लहान मुलीनं पहिल्यांदाच पिझ्झा खाल्यानंतर जी रिऍक्शन दिली आहे, ती रिऍक्शन किती प्रबंध जरी लिहिले, तरी त्यात शब्दबद्ध करता येणं, निव्वळ अशक्य आहे.

अत्यंत गोड आणि विलक्षण सुंदर

साखरेपेक्षाही गोड आणि गोंडसपेक्षाही क्यूट आणि ब्युटीफूलपेक्षाही विलक्षण सुंदर अशी रिऍक्शन दिलेली ही चिमुरडी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते आहे. पहिल्यांदाच पिझ्झा चाखल्यानंतर मनापासून तृप्त झाल्याची भावना देणाऱ्या या चिमुरडीचे डोळे विलक्षण सौंदर्यानं खुलले आहेत. लहानशा मुलीनं पिझ्झा खाल्यानंतरच दिल्यानंतर दिलेली पहिली प्रतिक्रिया ही सगळ्यांना भुरळ पाडतेय.

कुणी शेअर केला व्हिडीओ

इन्टाग्रामवर एक युजर आहे. या युजरचं नाव आहे, wholesomeversse. एखादी आवडीची आणि मनापासून हवी असलेली गोष्ट मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटेल? नेमकी तशीच निरागस आणि अत्यंत गोड प्रतिक्रिया या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी देताना दिसली आहे. हा व्हिडीओ पाहून काहींनी तर या मुलीला पिझ्झाच्या जाहिरातीत घेण्याचा सल्ला दिला आहे. यालहान मुलीचं नाव सॅली असून तिच्या आजीनं सगळ्यात आधी हा व्हिडीओ शेअर केला होता. 90 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अडीचशेहून अधिक इन्टाग्राम युजर्सनी या व्हिडीओवर कॉमेन्ट्सचा पाऊस पाडलाय.

पाहा हा खास व्हिडीओ –

इतर बातम्या –

इsssश! धावत्या बाईकवर नको ते चाळे करणारे ते दोघं कोण? Viral Videoनं चर्चांना उधाण

Video | Adorable dog | ही मिठी पाहून मुन्नाभाईही म्हणाला असता, ‘सर्कीट, हीच खरी जादू की झप्पी’

Viral : ऐकावे ते नवलच…! चक्क पिटुकल्या माऊचे डोहाळे जेवण, पाहा क्युट फोटो


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें