Video | Adorable dog | ही मिठी पाहून मुन्नाभाईही म्हणाला असता, ‘सर्कीट, हीच खरी जादू की झप्पी’

Video | Adorable dog | ही मिठी पाहून मुन्नाभाईही म्हणाला असता, 'सर्कीट, हीच खरी जादू की झप्पी'
Image Source - Tweeter Video Snap

तब्बल सात लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 48 हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलाय. असंख्य लोकांना कुत्र्याचं मिठी मारणं, भुरळ पाडून गेलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 03, 2022 | 5:17 PM

तुम्ही मुन्नाभाई एमबीबीएस (Munnabhai MBBS) पाहिला असेलच. त्यात मुन्नाभाई साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला जाऊन अचानक छप्पी देतो. वैतागलेला सफाई कर्मचारीही मुन्नाभाईच्या झप्पीनं विरघळून जातो. या सिनेमातला सीन (Scene) खऱ्याखुऱ्या आयुष्यातही घडला. फक्त घडला नाही, तर कॅमेऱ्यात कैदही झाला आहे. एका ट्विटर (Tweeter) युजरनं एक व्हिडीओ (Viral Video) शेअर केला आहे. बेघर झाल्यानं निराश झालेल्या एका माणसाला जादू की झप्पी मिळाली. ही झप्पी ज्यानं दिली, तोही तितकाच खास होता!

कुत्र्यानं दिली जादू की झप्पी!

एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्यानं निराश आणि हताश होऊन रस्त्यावर बसलेल्या एका मिठी मारली. आधी हा कुत्रा बेघर झालेल्या व्यक्तीच्या पायापाशी घुटमळत होता. त्यानंतर हा व्यक्ती निराश झालेला असल्याचं पाहून कुत्र्यानं या माणसाला मिठीच मारली. हताश झालेल्या व्यक्तीही कुत्र्याचं प्रेम पाहून विरघळून गेला. त्यानंही कुत्र्याला आपल्या कवेत घेतलं. नंतर दोघंही एकमेकांना बिलगले. हा व्हिडीओ पाहून कुत्र्यावर प्रेम करणारे तर भारावलेच. शिवाय कुत्र्यावर प्रेम करायलाही या व्हिडीओनं अनेकांना भाग पाडलं.

कुत्रा किंवा कुत्री पाळणं, हे अनेकांना आवडतं. कुत्रा-कुत्री ही अत्यंत प्रेमळ जमात आहे. प्राण्यांइतकं निस्वार्थ प्रेम कुणीच करत नाही, अशा प्रतिक्रिया हा व्हिडीओपाहून अनेकांनी दिल्या आहेत. इतकंच काय तर हताश, दुःखी आणि एकटेपणाने ग्रासलेल्या व्यक्तीला नेमकं काय हवंय, हे कुत्र्यानंही कसं काय बुवा हेरलं? याचंही अनेकांना नवल वाटलंय.

तब्बल सात लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 48 हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलाय. असंख्य लोकांना कुत्र्याचं मिठी मारणं, भुरळ पाडून गेलंय. दरम्यान, व्हिडीओमध्ये दिसणारा हा कुत्रा लॅब्राडॉर जातीचा असून सगळ्याच जातीचे कुत्रे हे प्रेमळ असतात. पण त्यातल्या लॅब्राडॉर जातीचे कुत्रे त्यातही सर्वात खास असतात.

पाहा व्हिडीओ –

इतर बातम्या –

भीषण बर्फवृष्टी काय असते? सौदी अरेबियातले हा Video पाहून कळेल, निव्वळ अविश्वसनीय!

निवृत्त गुरुजींसाठी गजराज मागवले, हत्तीवर बसवून मिरवणूक काढली! असं या गुरुजींनी केलं काय होतं?

Viral : ऐकावे ते नवलच…! चक्क पिटुकल्या माऊचे डोहाळे जेवण, पाहा क्युट फोटो


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें