भीषण बर्फवृष्टी काय असते? सौदी अरेबियातले हा Video पाहून कळेल, निव्वळ अविश्वसनीय!

सौदीतील सरकारी वृत्त संस्था एसपीएने या बर्फवृष्टीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गाड्यांवर बर्फाची एक लादीच तयार झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय.

भीषण बर्फवृष्टी काय असते? सौदी अरेबियातले हा Video पाहून कळेल, निव्वळ अविश्वसनीय!
सौदी अरेबियात जालेली बर्फवृष्टी

प्रचंड उकाडा आणि वाळवंटासारखा माहौल असणाऱ्या सौदी अरेबियात 2022च्या पहिल्याच दिवशी तुफान बर्फवृष्टी झाली आहे. अनेकजण या बर्फवृष्टीनं हैराण झाले आहे. वाळवंटावर बर्फाची सफेद चादर याआधी सौदी अरेबियात पाहिली गेली नव्हती. पण 1 जानेवारीला झालेल्या भयंकर बर्फवृष्टीनं अनेकांना चकीत केले आहे.

विक्रमी बर्फवृष्टी

गेल्या वर्षी फेब्रुवारीतही या बर्फवृष्टी झाली होती. तेव्हा झालेली बर्फवृष्टी ही तब्बल मागच्या 50 वर्षातल्या बर्फवृष्टीच्या तुलनेतली विक्रमी बर्फवृष्टी होती.

सौदीतील सरकारी वृत्त संस्था एसपीएने या बर्फवृष्टीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गाड्यांवर बर्फाची एक लादीच तयार झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय.

ढंडीच्या दिवसात सौदी अरेबियाचा उत्तरी भाग हा बर्फानं झाकला जातो. सौदीच्या उत्तरेत जबल अल-लावज, जबल अल-ताहिर आणि जबल अल्कान हा भाग मोडतो. या भाग पूर्णपणे बर्फानं गाडला गेल्याचं ढंडीच्या दिवसात पाहायला मिळतंय. अलमंड माऊंटेन नावानं ओळखला जाणार अल-लावज हा पर्वर तब्बल 2600 मीटर उंच अआहे. या पर्वतांवर अनेक ठिकाणी बदामाच्या बागा आहेत. ढंडीच्या दिवसांत हा परिसर अत्यंत विहंगम असा भासू लागतो.

सौदीत तापमान शून्याच्याही खाली जाणं एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. पण असं झाल्याच्या नोंदी नुकत्याचं केल्या गेल्य्यात. रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका इतका वाढतो, की पारा शून्याच्याही खाली जातो. यामुळे इथल्या नागरिकांनाही कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो.

तापमान आणखी घटणार!

दरम्यान, आता सौदीमध्ये तापमान आणखी घटू शकतं, असा अंदाज स्थानिक हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. फक्त सौदीच नाही, तर सौदीप्रमाणेच असलेल्या वाळवंटासारखा असलेला अल्जीरीयामध्येही ढंडीच्या दिवसात तुफान बर्फवृष्टी होते.

सौदी अरेबियात झालेल्या विक्रमी बर्फवृष्टीच्या घटनेचे व्हिडीओ अनेकांनी ट्वीटर, फेसबुक आणि इन्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. स्थानिक नागरिकांना या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठीचं आवाहन सौदी सरकारकडून करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ –

इतर बातम्या –

भाईचारा बना रहे! भारत आणि चीन सैनिकांचं एकमेकांना हॅपी न्यू ईयर, मिठाईही वाटली

Fish rain | इकडे मार्गशीर्ष संपला, तिकडे माशांचा पाऊस पडला? कसा? समजून घ्या!

ही कोरोना अंताची सुरुवात आहे? ओमिक्रॉन संकट की संकटमोचक? आफ्रिकेतल्या प्रयोगाची जगभर चर्चा

 

Published On - 3:28 pm, Mon, 3 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI