भाईचारा बना रहे! भारत आणि चीन सैनिकांचं एकमेकांना हॅपी न्यू ईयर, मिठाईही वाटली

1 जानेवारीला एकमेकांना मिठाई वाटत भारत आणि चीनमधील सैनिकांनी शुभेच्छांचीच देवाणघेवाण केली.

1/4
भारतीय सैनिकांनी चीन सैनिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सीमाभागातील दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना हॅपी न्यू इयर (Happy New Year) केलं आहे. (Image Source - ANI)

2/4
शनिवारी, म्हणजेच 1 जानेवारीला एकमेकांना मिठाई वाटत भारत आणि चीनमधील सैनिकांनी शुभेच्छांचीच देवाणघेवाण केली. गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही देशातल्या सीमाभागावरुन तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं होतं. त्या पार्श्वभूमीवर ही शुभेच्छांची देवाणघेवाण महत्त्वाची मानली जाते आहे.  (Image Source - ANI)

3/4
भारत आणि चीनच्या सैनिकांनी दोन्ही देशांमधल्या लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रेल (LAC) या सीमारेषेवर हॉट स्प्रिंग्स, डेमचोक, नथुला आणि कोंग्राला याठिकाणी कोविड एसओपींचं पालन करत मिठाईची देवाण-घेवाण केली.  (Image Source - ANI)

4/4
2019 पासून ते 2020 मध्येही भारत आणि चीन या देशांमधला तणाव वाढला होता. गेल्या वर्षी मे महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी भारत आणि चीन या दोन्ही देशांचं सैन्य आमने-सामनेदेखील आलं होतं. दरम्यान, त्यानंतर चर्चा करत, अनेक वाटाघाटी केल्यानंतर अखेर वातावरण निवळलं होतं. (Image Source - ANI)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI