AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही कोरोना अंताची सुरुवात आहे? ओमिक्रॉन संकट की संकटमोचक? आफ्रिकेतल्या प्रयोगाची जगभर चर्चा

म्हणजेच ओमिक्रॉन हा लसीच्या दोन्ही डोसपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं अभ्यासात दिसतंय. त्यामुळेच ओमिक्रॉनला डेल्टावरची नैसर्गिक लस मानलं जातंय.

ही कोरोना अंताची सुरुवात आहे? ओमिक्रॉन संकट की संकटमोचक? आफ्रिकेतल्या प्रयोगाची जगभर चर्चा
दक्षिण आफ्रिकेतल्या अभ्यासानुसार ओमिक्रॉन ही नैसर्गिक लस असल्याचं सांगण्यात येतंय
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 8:44 AM
Share

मुंबई, दिल्लीसह देशात ओमिक्रॉनचा विस्फोट झाल्याचं चित्रं आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अचानक दुप्पट झालीय. त्यात ओमिक्रॉनच्या (Omicron in Mumbai) रुग्णांची वाढलेली संख्याही लक्षणीय आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊनचं संकट घोंगावतंय असं वाटत असतानाच आफ्रिकेतून एक गूड न्यूज आहे. ही गूड न्यूज आहे ओमिक्रॉन आणि डेल्टा ह्या कोरोनाच्या व्हेरीएंटबद्दलची. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन आणि डेल्टावर एक प्रयोग करण्यात आला. (South African study on Omicron) ह्या अभ्यासाचे निष्कर्ष कोरोनाचा अंत सुरु झाल्याची आशा निर्माण करणारे आहेत. त्यामुळेच ओमिक्रॉन हे संकट नसून संकटमोचक असल्याचा दावा काही जाणकार करतायत.

नेमका प्रयोग काय करण्यात आला? ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण तेही सुरुवातीच्या टप्यात दक्षिण आफ्रिकेत मिळाले. त्यामुळे तिथं जे काही रुग्णांसोबत घडलं, त्याचा अभ्यास केला गेला. त्याच अभ्यासाच्या जोरावर ओमिक्रॉनबद्दलची प्राथमिक माहिती, अंदाज बांधले गेले. त्यातलाच एक अभ्यास ओमिक्रॉनबद्दलचा आहे. अशा 33 जणांचा अभ्यास केला गेला ज्यांनी दोन्ही डोस घेतले होते आणि काहींनी घेतलेही नव्हते. पण ओमिक्रॉनची लागण झाली होती. 14 दिवसानंतर असं लक्षात आलं की, ओमिक्रॉनची तटस्थ रहाण्याची क्षमता 14 पटीनं वाढली. एवढच नाही तर डेल्टासारखा धोकादायक विषाणूची तटस्थ रहाण्याची क्षमताही 4.4 पटीनं वाढली.

अभ्यासाचा निष्कर्ष काय? अलेक्श सिगल हे आफ्रिका हेल्थ रिसर्च संस्थेचे प्रोफेसर आहेत. ते असं म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेतल्या प्रयोगावरुन असं दिसतं की, ओमिक्रॉन हा कमी धोकादायक आहे. एवढच नाही तर धोकादायक असलेल्या कोरोनाच्याच डेल्टा व्हेरीएंटला तो आऊट करु शकतो. ओमिक्रॉन आता ज्या सौम्य स्थितीत आहे तो तसाच राहीला तर हे सकारात्मक संकेत आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या स्टडीनुसार, ज्यांना ओमिक्रॉनची लागण झालेली आहे, त्यांना पुन्हा धोकादायक अशा डेल्टा कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी आहे.

ओमिक्रॉन नैसर्गिक लस? कोरोनाचे आतापर्यंत जेवढे विषाणू, व्हेरीएंट आले त्यातला सर्वाधिक धोकादायक राहीला तो डेल्टा. दुसऱ्या लाटेत ह्याच डेल्टानं जगभर मृत्यूचं तांडव निर्माण केलं. पण त्याच डेल्टाला ओमिक्रॉन हा हद्दपार करत असल्याचं आफ्रिका, इंग्लंडमधल्या अभ्यासातून दिसून आलंय. डेल्टावर जालिम उपाय म्हणून वेगवेगळ्या लसींची निर्मिती केली गेली. जगभर लसीकरणाची मोहीम राबवली गेली. त्यानंतर डेल्टाचं संकट काही पूर्णपणे नाहीसं झालं नाही. पण ओमिक्रॉन आला आणि डेल्टाच्या तुलनेत तो घातक नसल्याचं सिद्ध झालं. ओमिक्रॉनचे लक्षण हे सौम्य आहेत. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याची गरज पडत नाही. मृत्यूचं प्रमाण नगण्य आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली, त्यांना डेल्टाची लागण पुन्हा होण्याची शक्यता कमी असल्याचं आफ्रिकेन स्टडीमध्ये निदर्शनास आलं आहे. म्हणजेच ओमिक्रॉन हा लसीच्या दोन्ही डोसपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं अभ्यासात दिसतंय. त्यामुळेच ओमिक्रॉनला डेल्टावरची नैसर्गिक लस मानलं जातंय.

अभ्यासात त्रुटी काय? दक्षिण आफ्रिकेत जो प्रयोग केला गेलाय, त्याची सँपल संख्या कमी आहे. त्याचा अभ्यास प्राथमिक स्वरुपाचा आहे. ओमिक्रॉन हा सौम्य स्थितीत आहे तो नेमका नैसर्गिकपणे तसाच आहे की, दोन डोसमुळे तो सौम्य आहे, की आधीच्या कोरोनाच्या लागणीमुळे याचा अभ्यास अजून पूर्ण व्हायचा आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे. ज्यांचे लसीचे दोन डोस झालेले आहेत, ते कोरोनाच्याविरोधात लढण्यासाठी अधिक सक्षम आहेत.

हे सुद्धा वाचा:

VIDEO : कुत्रा आणि मालकाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा काय आहे या व्हिडीओमध्ये!

पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार, गरोदर राहिल्याने पुण्यातील तरुणाशी लग्न लावलं

Vastu Tips | सावधान ! वास्तू दोष तुमच्या वैवाहिक जीवनात तेढ निर्माण करू शकतात, आजच करा योग्य ते बदल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.