पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार, गरोदर राहिल्याने पुण्यातील तरुणाशी लग्न लावलं

पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार, गरोदर राहिल्याने पुण्यातील तरुणाशी लग्न लावलं
पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन

पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या वडिलांनी गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. यातून ती गरोदर राहिली असल्याचं समजताच त्यांनी तिचा विवाह पुणे येथील तरुणाबरोबर लावून दिला.

रवी लव्हेकर

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 30, 2021 | 8:33 AM

पंढरपूर : बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती गरोदर झाली. त्यानंतर गर्भवती लेकीचा त्याने एका तरुणासोबत  घाईघाईत विवाह उरकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला असून तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी वडील आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या वडिलांनी गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. यातून ती गरोदर राहिली असल्याचं समजताच त्यांनी तिचा विवाह पुणे येथील तरुणाबरोबर लावून दिला.

उपचारादरम्यान प्रसुती

विवाह झाल्यानंतर काही महिन्यांतच मुलीला त्रास होऊ लागला. यामुळे ती माहेरी आली. नंतर वडिलांनी तिला पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तिची प्रकृती गंभीर झाली. पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

पीडितेला मुलगी झाली, मात्र ती स्वतः अल्पवयीन असल्यामुळे डॉक्टर आणि पोलिसांनी याबाबत तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा तिने गेल्या आठ महिन्यांपासून वडील अत्याचार करत असल्याचं सांगितलं. मी गरोदर राहिल्याने त्यांनी माझा विवाह लावून दिला. नंतर पतीनेही अत्याचार केल्याचा दावा तिने केला.

बाप-पतीला अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा विवाह लावून दिल्या प्रकरणी पोलिसांनी वडील आणि पती या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटकही केली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून वडिलांनी मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

Bank Robbery | मुंबईतील SBI बँक शाखेत दरोडा आणि हत्या, दोघा आरोपींना काही तासात अटक

52 कोटी रुपयांची कपात करून बाकीचे पैसे परत द्या; पियुष जैनची न्यायालयाकडे मागणी

महाडमधील महिला सरपंचाच्या हत्येचं गूढ उलगडलं, 30 वर्षीय तरुणाला अटक, बलात्काराचाही गुन्हा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें