महाडमधील महिला सरपंचाच्या हत्येचं गूढ उलगडलं, 30 वर्षीय तरुणाला अटक, बलात्काराचाही गुन्हा

महाडमधील महिला सरपंचाच्या हत्येचं गूढ उलगडलं, 30 वर्षीय तरुणाला अटक, बलात्काराचाही गुन्हा
प्रातिनिधीक फोटो

महाड तालुक्यातील एका गावाच्या महिला सरपंचाचा सोमवारी दुपारी खून झाला होता. विवस्त्र अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महाड तालुका पोलिसांनी नऊ टीम बनवून तपास सुरु केला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 30, 2021 | 1:50 PM

रायगड : महाड तालुक्यातील महिला सरपंचाची हत्या केल्याप्रकरणी 30 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन महिलेचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली. या प्रकरणात बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात टाकल्याची घटना तीन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात उघडकीस आली होती. जंगलात रस्त्याच्या कडेला दुपारी त्यांचा मृतदेह सापडला होता.

काय आहे प्रकरण?

महाड तालुक्यातील एका गावाच्या महिला सरपंचाचा सोमवारी दुपारी खून झाला होता. विवस्त्र अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महाड तालुका पोलिसांनी नऊ टीम बनवून तपास सुरु केला. तपास कामात डॉग स्क्वॉडची मदत महत्त्वपूर्ण ठरली.

अमिर शंकर जाधव (वय 30 वर्ष) याला पोलिसांनी अटक केली आहे. महाडचे उप विभागीय पोलिस अधिकारी निलेश तांबे यांनी याबाबत पत्रकार परीषद घेऊन माहिती दिली. पूर्वीच्या भांडणाचा राग धरुन आरोपीने महिलेला जीवे ठार मारल्याची कबुली दिल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम 376 म्हणजे बलात्काराचा आरोपही आरोपीवर करण्यात आलेला आहे.

चुलीसाठी लाकडं गोळा करायला जंगलात

महिला सरपंचाच्या डोक्यावर लाकडासारख्या वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला होता. घटनास्थळी त्यांना फरफटत आणल्याच्याही खुणा सापडल्या होत्या. त्यामुळे अन्य ठिकाणी त्यांची हत्या करुन मृतदेह जंगलात टाकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. सरपंच सकाळी चुलीसाठी लाकडं गोळा करायला घराबाहेर पडल्या होत्या, मात्र दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका व्यक्तीला जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. त्याने पोलीस पाटलांच्या माध्यमातून महाड पोलिसांना याविषयीची माहिती दिली होती.

संबंधित बातम्या :

Delhi Crime: दिल्लीत आणखी एका महिलेवर गँगरेप; दोघा नराधमांना अटक

Delhi Murder : इंस्टा पोस्टवरुन दिल्लीत 17 वर्षीय मुलाची हत्या, मुख्य आरोपी फरार

Italy Murder : पत्नीने सेक्सला नकार दिला म्हणून पतीने चाकूने भोसकले, चारित्र्यावरही घ्यायचा संशय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें