Marathi News » Photo gallery » These Vastu defects of house can create bad effect on your married life do not ignore them know more about them
Vastu Tips | सावधान ! वास्तू दोष तुमच्या वैवाहिक जीवनात तेढ निर्माण करू शकतात, आजच करा योग्य ते बदल
घरामध्ये वास्तुदोष असेल तर अनेक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत व्यक्तीच्या आरोग्यावर आणि परस्पर संबंधांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तो अताच बदला.
वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा असणे शुभ मानले जात नाही. असे म्हणतात की झोपताना शरीराचा कोणताही भाग आरशात दिसू नये.असे झाल्यास तुम्हाला शरीरिक त्रास होऊ शकतात. पती-पत्नीच्या खोलीत आरसा असेल तर त्यांच्या नात्यात दुरावा येतो. त्यामुळे बेडरूममध्ये आरसा न ठेवण्याचा प्रयत्न करा. पण कमी जागेच्या आभावी आरसा हलवता येत नसेल तर रात्री तो झाकून ठेवावा.
1 / 4
घरामध्ये बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीची नजर थेट आपल्या पलंगावर पडू नये. यामुळे वैवाहिक जीवनात वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमचा पलंग अशा प्रकारे ठेवा की तो बाहेरील लोकांना थेट दिसणार नाही. बेडरूममध्येही पडदे लावू शकता.
2 / 4
बेडरूममध्ये एकापेक्षा जास्त दरवाजे नसावेत. असल्यास, ते बंद ठेवा. तुमच्या बेडरूममध्ये अटॅच बाथरूम असेल तर दरवाजा नेहमी बंद ठेवा. अन्यथा, तुमच्या खोलीत नकारात्मकता वाढते, ज्यामुळे अनावश्यक भांडणे वाढू लागतात. याशिवाय बेडखाली कधीही कचरा टाकू नका.
3 / 4
प्रत्येकाला घराच्या मुख्य दरवाजातून ये-जा करावी लागते, याशिवाय घरातील ऊर्जा प्रवाहासाठी मुख्य दरवाजा हे सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते. ही जागा कधीही अस्वच्छ ठेवू नये.