AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : भारत-पाकिस्तान सामना होणार, तब्बल इतक्या कोटींचं नुकसान टळलं

India vs Pakistan : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रतिक्षा असते. पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 15 फेब्रुवारीला नियोजित सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता आठवड्यात पाकिस्तानने सामना खेळणार असल्याचं जाहीर केलंय.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 10, 2026 | 4:37 PM
Share
पाकिस्तानने नेहमीप्रमाणे यु-टर्न घेत जगासमोर आपली लाज घालवून घेतलीय. पाकिस्तानने 9 फेब्रुवारीला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध खेळण्यासाठी होकार दिला आहे. त्यामुळे आयसीसीचं कित्येक हजारो कोटी रुपयांचं नुकसान टळलंय. आयसीसी, पीसीबी आणि बीसीबी यांच्यात लाहोरमध्ये बैठक झाली. पाकिस्तानने या बैठकीत खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. पाकिस्तानने आधी 1 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध खेळणार नसल्याची भूमिका घेतली होती. (Photo Credit : Getty/PTI)

1 / 5
आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे 9 फेब्रुवारीला रात्री उशिराने पाकिस्तान टीम इंडिया विरुद्ध खेळणार असल्याचं  जाहीर केलं. अशात आता भारत-कोलंबो विमान प्रवासाच्या तिकीटांच्या दरात  तब्बल चौपट वाढ झाली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई ते कोलंबो विमान प्रवासाच्या तिकीटाच्या दरात 10 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता 60 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. (Photo Credit : Getty/PTI)

2 / 5
तसेच हा सामना होणार असल्याने तब्बल 1500 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान टळल्याचं समोर आलंय. इंडियन एक्सप्रेसने आयसीसीच्या सू्त्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याने जवळपास 174 मिलियन डॉलर अर्थात 1500 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान टळलं आहे. (Photo Credit : Getty/PTI)

3 / 5
पाकिस्तानने बांगलादेशच्या समर्थनार्थ टीम इंडिया विरुद्ध खेळणार नसल्याची भूमिका घेतली होती. आम्ही टीम इंडिया विरूद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता उर्वरित स्पर्धेत खेळणार असल्याचं पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.(Photo Credit : Getty/PTI)

4 / 5
केकेआरने आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमातून बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमान याला वगळल्यांनतर या प्रकरणाला तोंड फुटलं होतं. बांगलादेशने सुरक्षेचं कारण पुढे करत त्यांचे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, बीसीबीकडून अशी मागणी आयसीसीकडे करण्यात आली होती. मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळली. त्यानंतर बांगलादेशने या स्पर्धेतून माघार घेतली होती. बांगलादेशच्या समर्थनासाठी पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध न खेळण्याचा निर्णय तेव्हा पाकिस्तानने घेतला होता. मात्र काहीच दिवसात पाकिस्तानची अक्कल ठिकाण्यावर आली. (Photo Credit : Getty/PTI)

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना