तर तुमच्या मागे रेडा लावणार’, गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला असून, बांधकाम आणि इतर प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावर गंभीर आरोप केले आहेत. जखमी आणि मृतांना दिली जाणारी अपुरी मदत, रस्त्यांची दुर्दशा आणि ठेकेदारांकडून कमिशनच्या दाव्यांवर त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

राऊत यांनी एका नातेवाईकाला २७ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाल्याचा आरोप करत, “डंडेकर पॅटर्न” आणि कुंभमेळ्यातील कथित ३५ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला. नाशिकमधील रस्त्यांच्या स्थितीवर बोलताना त्यांनी, “डांबर संपले” या देवेंद्र फडणवीसांच्या विधाणाची खिल्ली उडवली. राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांना खड्ड्यांमध्ये टाकण्याची भाषा वापरत, त्यांचा गट रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार असल्याचे सांगितले. गिरीश महाजनांना थेट इशारा देताना, “भ्रष्टाचारातलं फक्त तुलाच कळतंय आणि म्हणून तुझ्यामागे हा रेडा लावणार आहोत,” असे म्हणत त्यांनी नाशिकमध्येच महाजनांच्या भानगडी उघड करण्याची धमकी दिली. सत्ताधाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही त्यांनी टीका केली.
Published on: Aug 17, 2026 02:51 PM
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा