AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FD की म्युच्युअल फंड… 5 वर्षात कोण देईल अधिक फायदा? आकडेवारीद्वारेच पाहा

5 लाख रुपयांना 5 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर एफडी की म्युच्युअल फंड ? यात जास्त नफा कोणत्या योजनेत असतो हे पाहूयात...

FD की म्युच्युअल फंड… 5 वर्षात कोण देईल अधिक फायदा? आकडेवारीद्वारेच पाहा
Fd or sip which is better
| Updated on: Aug 17, 2026 | 5:25 PM
Share

Fd or sip which is better: आजच्या काळात पैसे कमावणेच पुरेसे नाही तर आपला पैसा योग्य जागी गुंतवणे देखील गरजेचे आहे. प्रत्येकाला वाटते की त्याची बचत काळाबरोबर वाढावी. जेव्हा गुंतवणूक करण्याची वेळ येते तेव्हा भारतात सर्वात आधी दोन पर्याय पुढे येतात. फिक्स्ड डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड. मात्र गुंतवणूकदाराला चिंता असते की एफडी सुरक्षित की म्युच्युअल फंड ? जर तुमच्याकडे पाच लाखाची रक्कम आहे. आणि तुम्ही तिला पाच वर्षांसाठी गुंतवू इच्छीता तर हे जाणून घेणे महत्वाचे आहे की सर्वात जास्त फायदा कुठे मिळेल ?

बँक एफडी का भरवशाची…

भारतीय कुटुंबात गुंतवणूकीचा सर्वात पारंपारिक प्रकार बँकेची एफडी असतो. कारण यात सुरक्षा महत्वाचा मुद्दा असतो. गुंतवणूकीवर भले परतावा कमी मिळत असेल पण पैसे सुरक्षित राहाणे महत्वाचे असते. त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिट तुमच्या साठी चांगला पर्याय आहे. शेअर बाजारात होणाऱ्या चढ-उताराचा एफडीवर काहीही परिणाम होत नाही. जर तुम्ही ५ लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकले तर ६.५ टक्के वार्षिक व्याज मिळत असेल तर ५ वर्षानंतर तुम्हाला १,९०,२१० रुपये केवळ व्याज म्हणून मिळते. या प्रकारे मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुमची एकूण रक्कम वाढून ६,९०,२१० रुपये होते. ही त्या गुंतवणूकदारांसाठी एकदम अचूक असते ज्यांना कोणत्याही तणावाशिवाय निश्चित नफा हवा असतो.

म्यूच्युअल फंडात बंपर नफ्याचा चान्स

दुसरीकडे जर तुम्ही थोडी जोखीम घेऊ इच्छीत असाल तर म्युच्युअल फंड एक शानदार पर्याया साबित होऊ शकतो. म्युच्युअल फंडाचा पैसा शेअर बाजारातील चढ उतारावर अवलंबून असतो. यामुळे यात दीर्घकाळात कपाऊंडिंग ( चक्रवाढ ) चा जबरदस्त फायदा असतो. समजा तुम्ही पाच लाख चांगल्या म्युच्युअल फंडात पाच वर्षांसाठी गुंतवले तर यात १२ टक्के वार्षिक रिटर्न मिळते. तर तुमची अंदाजित कमाई सुमारे ३,८१, १७० रुपये होते. म्हणजे पाच वर्षांनंतर तुमच्या पाच लाखाची किंमत वाढून ८,८१,१७० रुपये होऊ शकते. मात्र, हे देखील ध्यानात घ्यायला हवे की म्युच्युअल फंडाचा परताव्याची कोणतीही लिखित गॅरंटी नसते. बाजारातील चढ – उतारावर ही रक्कम मिळण्याचे निश्चित होते.

येथे तक्ता पाहा –

वर्ष एफडीची एकूण व्हॅल्यू ( 6.5 टक्के ) म्युच्युअल फंडाची एकूण व्हॅल्यू ( 12 टक्के ) दोघांमधील फरक ( MF चा अतिरिक्त फायदा )
पहिले वर्ष5,33,338 रुपये5,60,000 रुपये26,662 रुपये
दुसरे वर्ष5,68,893 रुपये6,27,200 रुपये58,307 रुपये
तिसरे वर्ष6,06,819 रुपये7,02,464 रुपये95,645 रुपये
चौथे वर्ष6,47,273 रुपये7,86,760 रुपये1,39,487 रुपये
पाचवे वर्ष6,90,210 रुपये8,81,1701,90,960 रुपये

आधी स्वत:ला हे प्रश्न विचारा…

आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तुम्हाला गुंतवणूक करायला हवी का. आर्थित तज्ज्ञांच्या मते कोणत्याही ठिकाणी पैसे लावणे ही तुमची आर्थिक गरज, गुंतवणूकीचा कालावधी तसेच जोखीम उचलण्याच्या क्षमतेचे आकलन करायला हवे. आकडे स्पष्ट सांगतात की म्युच्यु्अल फंड एफडीच्या तुलनेत परतावा अनेक पठीने जास्त आहे.परंतू यात रिस्क देखील आहे. जर तुम्ही तुमच्या पैशांवर रिस्क घेऊ शकत नाही तर एफडीचा पर्याय स्वीकारा. तर तुमचा हेतू महागाईवर मात करुन संपत्ती तयार करण्याचा असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य आहे.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण