AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

नुसती धावपळ… धुराचा लोट…आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

| Updated on: Aug 17, 2026 | 3:35 PM
Share

मुंबईतील चर्चगेट परिसरात असलेल्या आयकर विभागाच्या कार्यालयाच्या तळमजल्याला (बेसमेंट) आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवळपास आठ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

आग लागल्यानंतर कार्यालयाच्या बेसमेंटमधून धुराचे मोठे लोट बाहेर पडत होते, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बेसमेंटमधील एका खोलीत (रूम नंबर 10) ही आग लागली होती आणि हळूहळू ती वर सरकत असल्याचे दिसून आले. आग लागल्यामुळे कार्यालयात अडकलेल्या दोन कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि उपस्थित कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत करत आहेत. स्वातंत्र दिनानिमित्त सजवलेल्या या इमारतीत आग लागल्याने सर्वांनी चिंता व्यक्त केली. आग पूर्णपणे विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत आहेत.

Published on: Aug 17, 2026 03:35 PM

Follow Us