रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
एक मोठी बातमी आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री आता होणार आहेत. अखेर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा या ठिकाणी सुटलेला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी गोगावलेंचं नाव जाहीर झालंय. रायगडच्या पालकमंत्रीपदी आता भरत शेठ गोगावले यांची वर्णी लागलेली आहे. आपल्यासोबत आहेत भरत शेठ. […]
एक मोठी बातमी आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री आता होणार आहेत. अखेर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा या ठिकाणी सुटलेला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी गोगावलेंचं नाव जाहीर झालंय. रायगडच्या पालकमंत्रीपदी आता भरत शेठ गोगावले यांची वर्णी लागलेली आहे. आपल्यासोबत आहेत भरत शेठ. भरत शेठ टीव्ही नाईनशी तुम्ही खास बातचीत करा. सगळ्यात आधी तुमची प्रतिक्रिया की कसं वाटतंय? कारण पावणेदोन वर्षाचा हा वेटिंग पिरियड होता. बरेच चढउतार यामध्ये आले. हा काळ जेव्हा आठवतो तेव्हा काय आठवतं? ज्या वेळेला आता हे पालकमंत्री पद हे मोठं पद आहे, जिल्ह्याचं पद असतं आणि त्यामुळे आम्हाला ही पहिल्याच वेळेला संधी मिळते कारण मागच्या वेळेला आमचं ते पद थांबलेलं होतं आणि जवळजवळ पावणे दोन वर्ष आम्हाला वाट पाहावी लागली. परंतु आता वरून जो काय निर्णय झालेला आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्यासाठी आम्हाला समाधान आहे. नक्कीच तुमची संधी का हुकली होती? याबद्दल तुम्ही कधी खुलून बोलला नाहीत, आज बोलाल? नाही. संधी हुकली होती असं त्यातला बाब नव्हती. कारण त्या वेळेला जे काही वरिष्ठ पातळीवरून ठरलेलं होतं त्या अनुषंगाने, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगून ते पद जे काय थांबलेलं होतं ते आता मिळते आणि त्याच्यामुळे आता जे काय पाठच्या घडामोडी झाल्या त्या परत दुबारा काय काढणं मला उचित वाटत नाहीये. नक्कीच. पण एकनाथ शिंदे यांचा किती मोठा श्रेय आहे?
कारण तुम्ही वारंवार जायचा, आम्ही पण पाहतो तुम्ही नंदनवनला जायचा, बऱ्याचदा साहेबांच्या कानावर घालायचा, साहेब पण म्हणायचे की हो सकारात्मक आहे आणि होणार आणि आज शेवटी झालं. त्यामुळे याचं श्रेय नेमकं कोणाला जातंय? नाही एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः की ज्यावेळेला हे पद आमच्यासाठी मागून घेतलं आणि ते आज मिळतंय. त्यामुळे त्यांचा तर वाटा आहेच त्याबद्दल काही दुमत नाहीये आणि मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलेलं आहे की भरतशेटला द्यावं, दिलं पाहिजे कारण ज्या ज्या वेळेला आम्हाला चर्चा व्हायची त्या त्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी पण आम्हाला आश्वासित केलं होतं की भरतशेटना पद हे मिळणं अपेक्षित आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं होतं. काही कारणास्तव थांबलं होतं, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही मनापासून माझ्यासाठी जे काही वरपासून इथपर्यंत जे काय सांगून जे काही पद मिळवलं त्याबद्दल त्यांचा वाटा श्रेयाचा आहे, याबद्दल दुमत नाही. मनासारखं झालं आणि कोट घालायला सुरुवात करणार आता भरत शेठ गोगावले. कोटाचा काही प्रश्नच नाही. तुम्ही घालणं बंद केलं होतं. ज्याचं मन मोठं आहे त्याला कोटाचा काही प्रश्न येत नाही. परंतु एक आपली म्हण असते, तर ठीक आहे तुमचे विचार असेल तर तो कोट घालू आम्ही. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन कमलेश सह गिरीश गायकवाड, टीव्ही नाईन मराठी.
Published on: Aug 17, 2026 02:06 PM
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी

