AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य

| Updated on: Aug 17, 2026 | 2:40 PM
Share

दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय. मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. विकास कामांच्या प्रश्नावरती ही भेट घेतली असल्याचं फडणवीसांनी स्वतः ट्वीट करत सांगितलं आणि त्यानंतर आता मुरलीधर […]

दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय. मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. विकास कामांच्या प्रश्नावरती ही भेट घेतली असल्याचं फडणवीसांनी स्वतः ट्वीट करत सांगितलं आणि त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र असल्याचं आपण पाहतोय. फडणवीसांनी यासंदर्भात काय ट्वीट केलं होतं ते देखील आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघूयात. देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि भारताचे वैश्विक नेतृत्व नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीमध्ये भेट घेतली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांना दिली असं देखील या दरम्यान फडणवीस बोलले. केंद्र सरकार सोबत समन्वयातून राबवल्या जात असलेल्या योजना आणि प्रकल्पांबाबत सहकार्य देखील मागितलं, असेही फडणवीसांनी सांगितलेलं आहे. नेहमीप्रमाणेच त्यांची भेट एक नवी ऊर्जा देणारी असते. त्यांचे विकासाच्या प्रश्नांवरती बहुमूल्य मार्गदर्शन असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा यासाठी मी त्यांचा नितांत आभारी आहे, असंही फडणवीस म्हणालेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण दिल्लीमध्ये बघू शकतोय. यासंदर्भात ट्वीट करत स्वतः फडणवीसांनीच माहिती दिलेली होती. राज्यातील विकास प्रकल्पांसंदर्भात भेट घेतली असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि नेहमी राज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असलेला पाठिंबा त्यासाठी आभार मानले असल्याचं देखील फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलेलं आहे. योजना आणि अनेक प्रकल्पांसंदर्भात सहकार्य देखील मागितलं असं देखील फडणवीसांनी या दरम्यान सांगितलं.

Published on: Aug 17, 2026 02:39 PM

Follow Us