…नाहीतर तुझी आई मला मारेल! लग्नानंतर कशी होते ‘या’ची फजिती? Video viral

प्रदीप गरड

Updated on: Mar 06, 2022 | 8:30 AM

Funny video : मौसम लग्नसराईचा आहे. यासंबंधीचे व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. व्हिडिओ लग्नाच्या आधी कसे रिलॅक्स लाइफ (Relax) असते आणि लग्नानंतर कसे तणावाचे किंवा हेक्टिक (Hectic) असते हे दाखवणारे असतात. हे सर्व विनोदी (Comedy) शैलीने केलेले असते.

...नाहीतर तुझी आई मला मारेल! लग्नानंतर कशी होते 'या'ची फजिती? Video viral
लग्नाच्या आधी आणि नंतरचं आयुष्य दाखवणारा व्हिडिओ
Image Credit source: Youtube

Funny video : मौसम लग्नसराईचा आहे. यासंबंधीचे व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यात काही व्हिडिओ असे असतात, की लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतरचा फरक दाखवणारे असतात. तर काही व्हिडिओ लग्नाच्या आधी कसे रिलॅक्स लाइफ (Relax) असते आणि लग्नानंतर कसे तणावाचे किंवा हेक्टिक (Hectic) स्वरुपाचे असते हे दाखवणारे असतात. अर्थात हे सर्व विनोदी (Comedy) शैलीने केलेले असते. हलक्या फुलक्या मिनिटभरात सर्व सांगितले असल्याने सोशल मीडियावरचे यूझर्स ते पाहतात, कारण त्यांचाही वेळ वाया जात नाही आणि मनोरंजनही होते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. लग्नाच्या आधी त्याचे कसे लाड होतात आणि लग्नानंतर कशी कामं करावी लागतात हे मजेशीर स्वरुपात व्हिडिओत दाखवले आहे.

लग्नाआधी आणि लग्नानंतर…

एक मुलगा मोबाइलवर पबजी खेळत असतो. आई तिकडून आवाज देते आणि जेवण कर, असे मुलाला म्हणते. मुलगा तर तोऱ्यातच असतो. तो म्हणतो मी खेळण्यात व्यस्त आहे. माझी पबजीची मॅच सुरू आहे. मला नाही खायचे आत्ता. तरी आई त्याला जेवण आणून देते. व्हिडिओतमध्ये आणखी पुढे तर मजेशीरच दाखवले आहे. त्या मुलाचे लग्न होते, त्याला छोटे बाळही होते. त्याला तो भरवत असतो. तो त्या बाळाला म्हणतो, की खा नाहीतर तुझी आई मला मारेल…

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर चेतन मोंगा व्लॉग (Chetan Monga Vlogs) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ‘Relatable’ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. 5 मार्चला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला सातत्याने व्ह्यूज वाढत आहेत. पहिल्या पाच तासांतच याला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले. कमेंट्सही यावर मजेशीर करण्यात आल्यात. (Video courtesy – Chetan Monga Vlogs)

आणखी वाचा :

…अन् धाडकन् दगडावर जाऊन आदळला; Stunt करा पण जरा जपून, Video viral

Video viral : माकडाची अद्भुत युक्ती! यूझर्स म्हणाले, ‘वाघाला उपाशी राहावे लागले, माकडाला नवे जीवन मिळाले..!

‘या’ ऑटोवाल्याची Creativity तर पाहा; लोक म्हणतायत, मुद्दा Global पण विचार Local!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI