Video | मांजरीची कमाल, महिलेची केली हुबेहूब नक्कल, मजेदार व्हिडीओ पाहाच

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये प्राण्यांचे व्हिडीओ विशेष रुपाने पसंद केले जातात. सध्या तर एका मांजरीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Video | मांजरीची कमाल, महिलेची केली हुबेहूब नक्कल, मजेदार व्हिडीओ पाहाच
cat viral video

मुंबई :सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये प्राण्यांचे व्हिडीओ विशेष रुपाने पसंद केले जातात. सध्या तर एका मांजरीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरुन हसत आहेत. व्हिडीओतील मांजरीने केलेली करामत एकदम खास आहे. (cat comedy women funny video went viral on social media)

मांजरीसमोर महिला केस विंचरतेय

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला केस विंचरत आहे. केस विंचरताना या महिलेसमोर एक मांजर उभी आहे. ही मांजर महिलेचे निरीक्षण करत आहे. व्हिडीओतील मांजर फक्त महिलेचे निरीक्षण करेल असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षांत मात्र मांजरीने वेगळाच कारनामा करुन दाखवला आहे. मांजर महिलेची हुबेहूब नक्कल करत आहे.

मांजरीने नेमकं काय केलं ?

व्हिडीओमध्ये मांजर तिच्यासमोर उभ्या असलेल्या महिलेकडे पाहत आहे. महिला केस विंचरत असल्याचे दिसताच मांजरसुद्धा आपल्या हातांनी केस विंचरल्यासारखे करत आहे. आपले हात कानांजवळ नेऊन मांजर केस विंचरल्यासारखं करताना आपल्याला व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसेल. मांजरीच्या जवळ कंगावासुद्धा नाहीये तसेच मांजरीला केससुद्धा नाहीत. तरीसुद्धा मांजर केस नीट करण्याचा प्रयत्न करत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा सगळा मजेदार प्रकार पाहून नेटकरी पोट धरून हासत आहेत. काही नेटकऱ्यांनी मांजरीची करामत पाहून मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही लोकांनी या व्हिडीओला आपल्या अकाऊंटवर उत्स्फूर्तपणे शेअर केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही. मात्र चर्चेत आलेला व्हिडीओ Buitengebieden या ट्विटर अकाऊंवर तुम्हाला पाहता येईल.

इतर बातम्या :

VIDEO : मोबाईल हवा म्हणून माकडाने दाखवला समजूतदारपणा! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

बास्केटबॉल खेळणारी खारुताई पाहिली आहे? व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल..!

Viral Video : 10 वर्षांपासून एकटेपणा आलेल्या शार्कने टाकीवर मारलं डोकं, हा व्हिडीओ पाहाच

(cat comedy women funny video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI