AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: भारत-पाकिस्तान मॅचआधी मौका-मौकाची जाहिरात, भारतीय नेटकऱ्यांकडून व्हिडीओ व्हायरल

भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्षाच्या तोंडावर 'मौका-मौका' चा व्हिडिओ आला नाही तर कसं होईल? आधी तरी नेटीझन्स हे गाणं तयार करत होते, आता तर टी20 वर्ल्डकपचे अधिकृत प्रसारक 'स्टार स्पोर्ट्स'नेच हा नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. जो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे

Video: भारत-पाकिस्तान मॅचआधी मौका-मौकाची जाहिरात, भारतीय नेटकऱ्यांकडून व्हिडीओ व्हायरल
भारत पाकिस्तान सामन्याआधी मौका मौकाची नवी जाहिरात
| Edited By: VN | Updated on: Oct 23, 2021 | 6:41 PM
Share

भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतो, मैदानाच्या आत असो की बाहेर वा सोशल मीडियावर, सगळीकडे वातावरण चांगलंच तापलेलं असतं. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्षाच्या तोंडावर ‘मौका-मौका’ चा व्हिडिओ आला नाही तर कसं होईल? आधी तरी नेटीझन्स हे गाणं तयार करत होते, आता तर टी20 वर्ल्डकपचे अधिकृत प्रसारक ‘स्टार स्पोर्ट्स’नेच हा नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. जो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे, त्यामुळे सामन्याबद्दल निर्माण होणाऱ्या वातावरणाला एक वेगळा रंग मिळाला आहे. (Before ind vs pak match New mauka mauka ad goes viral on social media)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसतं की, शाळेत दोन मुलं आपापसात बोलत आहेत की, जो झिरो करेल तो सुद्धा हिरो होईल, तेव्हा मागून एक मुलगी म्हणते की, तो तुझ्या वडिलांबद्दल बोलत आहेस. त्यानंतर तो मुलगा आपल्या मित्राला सांगतो की, माझे वडील शून्याचे शोध लावणारे आहेत का? त्यानंतर वर्गातील शिक्षक सुद्धा सांगतात की, शून्य ही अशी संख्या आहे की, जर तिला कशानेही गुणलं तरी त्याची टोटल शून्यच होते.

हा व्हिडीओ पाहा

व्हिडिओच्या शेवटी पाहिले जाऊ शकते की, मुले शेवटी त्यांचे जेवण करत आहेत, तेवढ्यात त्या मुलाचे वडील तिथं येतात, त्यानंतर तो त्याच्या वडिलांना विचारतो की, तुम्ही शून्याचा शोध लावला आहे का? ज्यावर वडील म्हणतात! हे तुला कुणी सांगितले …? त्यानंतर ती मुलगी उठते आणि म्हणते की तुम्ही प्रत्येक वेळी इतके शून्य आणलेस त्यामुळे शुन्याचा शोध तुम्हीच तर लावला आहे….! मुलीचे उत्तर ऐकून पाकिस्तानी चाहत्याचे तोंड पूर्णपणे बंद होते.

हेही पाहा:

Video: “भाई, मुझे मारो” म्हणणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीचा नवा व्हिडीओ, नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद

Video: ती ट्रेन चालवत स्टेशनपर्यंत पोहचली, तो ट्रेनसमोरच फुलांचा गुलदस्ता घेऊन उभा राहिला, अनोख्या प्रपोजचा व्हिडीओ व्हायरल

 

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ