AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: लग्नाच्या दिवशीच बायकोनं दिलं भन्नाट सरप्राईज, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; ती समोर आली आन्…

Video: सध्या सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ व्हायरस होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 7 कोटी लोकांनी पाहिला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये बायकोने नवऱ्याला दिलेल्या सरप्राइजने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Video: लग्नाच्या दिवशीच बायकोनं दिलं भन्नाट सरप्राईज, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; ती समोर आली आन्...
Viral VideoImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 03, 2025 | 5:58 PM
Share

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लग्नाच्या दिवशीच बायकोने नवऱ्याला एक भन्नाट सरप्राइज दिले आहे. हे सरप्राइज पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 7 कोटी लोकांनी पाहिला आहे. आता बायकोने नेमकं काय केलं आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या या व्हिडीओमध्ये नवी नवरी 90 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या अल्बममधील एका गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. यावेळी नवऱ्याचा प्रतिसादही पाहण्यासारखा आहे. नवरीने तिच्या अप्रतिम नृत्य सादरीकरणाने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. सामान्यतः मुली त्यांच्या खास दिवशी ट्रेंडिंग गाण्यांवर नाचतात, परंतु या आधुनिक वधूने 90 च्या दशकातील एक सुपरहिट गाणे निवडून सर्वांना आश्चर्यचकित केले. बायकोच्या अदांनी नवऱ्याचा प्रतिसाद या व्हिडओला आणखी खास बनवत आहे.

वाचा: अभिनेत्री तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती? ऐकून फुटेल घाम

व्हायरल होत असलेल्या या व्हिडओमध्ये बायको 90 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या अल्बममधील एका गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. नवरी नाजूकता, चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि कमालचे हावभाव यांनी केवळ वातावरणात रंगत आणली नाही, तर तिथे उपस्थित प्रत्येकाला मंत्रमुग्ध केले.

नवऱ्याचा प्रतिसाद पाहण्यासारखा

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा वधू स्टेजवर परफॉर्म करत होती, तेव्हा वर डोळे न मिचकावता तिच्याकडेच पाहत राहिला. वराच्या प्रतिसादात आपल्या वधूसाठी प्रेम आणि अभिमान स्पष्टपणे दिसत होता, ज्यामुळे नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

7 कोटी लोकांनी पाहिला हा व्हिडीओ

हा डान्स व्हिडओ इंस्टाग्रामवर @toor.manpreet या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत जवळपास 7 कोटी वेळा पाहिला गेला आहे आणि 44 लाखांहून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे. व्हिडओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “नवऱ्यासाठी नाचण्याचा आनंद कशाशीच तुलना होऊ शकत नाही.” या व्हिडीओवर एक युजरने विनोदीपणे कमेंट करत म्हटले की, “भाऊ, तुझ्या कर्मांची यादी जरा दे.” दुसऱ्या युजरने म्हटले, “मी तर हा व्हिडओ पुन्हा पुन्हा पाहत आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “खूपच गोड.”

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.