व्हायरल मांजरीला पाहून तुम्ही म्हणाल व्वा लाईफ हो तो ऐसी!

सध्या सोशल मीडियावर एका मांजरीचा मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्हाला ही हा व्हिडीओ खूप आवडेल. तुम्हीही त्या व्हिडीओ पाहून स्वतःला रोखू शकणार नाही तूमच्या तोंडातून एकदा तरी निघेल व्वा लाईफ हो तो ऐसी!

व्हायरल मांजरीला पाहून तुम्ही म्हणाल व्वा लाईफ हो तो ऐसी!
cat
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 12:54 PM

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी प्राण्यांचे व्हिडीओ अनेकांना आवडतात. त्यामुकया जनावरांचे हावभाव त्यांच्या कृती आपले मन खिळवून ठेवतात तुमचे खूप मनोरंजन करतात. सध्या सोशल मीडियावर एका मांजरीचा मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्हाला ही हा व्हिडीओ खूप आवडेल. तुम्हीही त्या व्हिडीओ पाहून स्वतःला रोखू शकणार नाही तूमच्या तोंडातून एकदातरी निघेल व्वा लाईफ हो तो ऐसी!

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, तुम्ही हा व्हिडिओ @hopkinsBRFC21 च्या पेजवर पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना, पेजच्या अॅडमिन कॅप्शनमध्ये लिहिले, ‘चुकीचे असू शकते, पण मला वाटते की ही मांजर आराम करात आहे.’

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये

व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की एक गोंडस मांजर बेडवर आराम करत आहे. छताकडे पाहत उलटे झोपली आहे. तिने आपले हात आणि पाय पूर्णपणे पसरवले आहेत आणि हळूहळू तिची शेपटी हलवत आहे. हे मांजर गोंडस कोणाला भावही देत ​​नाही आहे हे पाहील्यावर तुम्हालाही या मांजरीचा हेवा वाटेल.

सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. युजर्स पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाइक्स मिळाले आहेत एका युजरने ‘किती सुंदर.’ असे कॅप्शन दिले आहे. तर दुसऱ्या युजरने , ‘मांजरीचे बरेच व्हिडिओ पाहिले आहेत पण आजपर्यंत असा गोंडस आणि गोंडस व्हिडिओ कधीच पाहिला नाही’ अशी कमेंट केली आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.

इतर बातम्या :

ज्वालामुखीचा उद्रेक, 11 फुटापर्यंत उंच उडाली राख, व्हिडीओ पाहाल तर अंगावर काटा येईल!

रेल्वे रुळावरील ट्रकचा भीषण आपघात, थरकाप उडवून टाकणारा व्हिडीओ

Funny Fight Video | वृद्ध महिलांमध्ये तुफान मारामारी, नेटकरी म्हणतात ‘यांना WWE मध्ये पाठवा’, धम्माल व्हिडीओ पाहाच