नाव काय आहे, म्हणत लायटर घेऊन करतो मुलीचा पाठलाग! कारण ऐकून हसू येईल; Video viral

Funny video : एक वेगळा पण हसवणारा (Comedy) व्हिडिओ व्हायरल (Viral) झालाय. अनेकवेळा आपण पाहतो, की आपल्या नावांवरून (Name) विनोद होत असतात. या व्हिडिओमध्येही असेच झाले आहे.

नाव काय आहे, म्हणत लायटर घेऊन करतो मुलीचा पाठलाग! कारण ऐकून हसू येईल; Video viral
नावावरून कशी धमाल होते, हे दाखवणारा व्हायरल व्हिडिओ
Image Credit source: Youtube
प्रदीप गरड

|

Mar 10, 2022 | 7:30 AM

Funny video : विनोदी व्हिडिओ कोणाला पाहायला नाही आवडत? सोशल मीडियावर सक्रिय असणारे विनोदी व्हिडिओ तर आवडीने पाहतात. या प्रकारात प्राण्यांचे व्हिडिओ, लहान मुलांचे व्हिडिओ तसेच तरुणांचे, मित्र-मैत्रिणींचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत असतात. काही अजब लोक काहीतरी वेगळेच करण्याचा प्रयत्न करतात. एखादी भन्नाट कल्पना असेल तर लोकही त्याला आवडीने दाद देतात. आता असाच एक वेगळा पण हसवणारा (Comedy) व्हिडिओ व्हायरल (Viral) झालाय. अनेकवेळा आपण पाहतो, की आपल्या नावांवरून (Name) विनोद होत असतात. नावाशी साधर्म्य असल्यास किंवा वेगळे काहीतरी नाव असेल तर धमाल उडते. या व्हिडिओमध्येही असेच झाले आहे. आपण बरेचवेळा म्हणतो, की नावाचा आणि प्रत्यक्ष वागण्याचा काही संबंध नाही. किंवा नावाप्रमाणेच आहेस, वगैरे… या व्हिडिओत काय धमाल झालीय, ती पाहिल्यावर तुम्हालाही हसू येईल.

ज्योतीची कमाल

एक मुलगी उभी असते. तिथे एक मुलगा येतो आणि तिला नाव विचारतो. ती तिचे नाव ज्योती सांगते. त्यावेळी तिथे त्या मुलाचा मित्रही असतो. मग ते दोघेही त्या मुलीचा पाठलाग करतात. विशेष म्हणजे त्या मुलाच्या हातात लायटर असते. आता तुम्ही म्हणाल, हे लायटर घेऊन तो का पळत आहे. तर त्याचे असे, की त्या मुलीचे नाव ज्योती आणि लायटर पेटवल्यानंतर जी ज्योत निघते, ती किती वेळ चालते ते त्यांना पाहायचे असते. मग ते दोघेही तिचा पाठलाग करतात. रस्त्याने जात असताना तर आणखीनच धमाल उडते. तिथे त्यांना एक मुलगा सापडतो. पुढे काय होते, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा…

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर शॉर्ट ब्रेक (Shorts Break) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 8 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 5.3 मिलियनहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यूझर्सना ही कन्सेप्ट आवडली आहे. 33 सेकंदांचा हा व्हिडिओ आपल्याला हसवल्याशिवाय राहत नाही. ‘Naam kya hai Tera?? Part 3′ असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. (Video courtesy – Shorts Break)

आणखी वाचा :

होय..! ‘ती’ सर्वकाही करू शकते, ‘या’ चिमुरडीला पाहून तुम्हीही हेच म्हणाल; Kid stunt video viral

देशाची शान तिरंग्याचा जगभरात डंका; ‘हा’ Viral video पाहा, अभिमानानं छाती फुलेल

PV Sindhu : Badminton खेळाडूच नाही तर उत्तम Dancerही! सोशल मीडियावरचा Trend केला Follow, पाहा Video

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें