नमो नमो! हे शिवमंदिर बघा, नॉर्वेजियन डिप्लोमॅटने शेअर केला व्हिडीओ! पुन्हा पुन्हा बघाल

| Updated on: Oct 04, 2022 | 10:36 AM

हा व्हिडीओ अतिशय सुंदर आहे. या मंदिराचा ड्रोन शॉट शेअर करण्यात आलाय.

नमो नमो! हे शिवमंदिर बघा, नॉर्वेजियन डिप्लोमॅटने शेअर केला व्हिडीओ! पुन्हा पुन्हा बघाल
shivmandir
Image Credit source: Social Media
Follow us on

नॉर्वेजियन डिप्लोमॅट एरिक सोलहाइम यांनी काही दिवसांपूर्वी हिमालयाचे अप्रतिम फोटो ट्विट केले होते. हे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. यात एरिक सोलहाइम यांनी हिमालयातील दऱ्या खोऱ्यांना मंगळ ग्रहाची उपमा दिली होती. विविधतेने नटलेला भारत एरिक सोलहाइम यांना प्रचंड भावलाय. एरिक सोलहाइम यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात भारतातलं सगळ्यात उंचीवर असणारं शिवमंदिर आहे. हा व्हिडीओ अतिशय सुंदर आहे. या मंदिराचा ड्रोन शॉट शेअर करण्यात आलाय.

हे मंदिर बघा. बर्फाळ प्रदेशातलं हे शिवमंदिर अप्रतिम आहे. हा ड्रोन शॉट आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटाचं प्रसिद्ध गाणं ‘नमो नमो’ हे गाणंही ऐकायला मिळतंय.

या पोस्टने इंटरनेट युजर्सचे लक्ष वेधून घेतले. नॉर्वेजियन डिप्लोमॅट एरिक सोलहाइम यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहीले की, “इनक्रेडिबल इंडिया! जगातलं सगळ्यात उंचीवर असणारं शिवमंदिर, 5000 वर्षे जुनं! उत्तराखंड”

एका वापरकर्त्याने लिहिले की, “मंदिराची स्थापत्यकला उत्कृष्ट आहे, ती हिमस्खलन आणि भूकंपातूनही टिकून राहते हे आश्चर्यकारक आहे,”

काही नेटकऱ्यांनी सगळ्यात उंचीवर असणारं, 5000 वर्षांपूर्वीचं मंदिर हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय. मंदिर अप्रतिम असल्याचं मात्र सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे.