AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: जगातील पहिली मांजर शेफ, भन्नाट रेसिपी पाहून चांगले चांगले गार, नेटकरी म्हणाले, ‘बाई, तूच काय ती सुगरण!’

एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता आपण ज्या मांजरीबद्दल बोलत आहोत ती खूप लोकप्रिय आहे. कारण, ती फक्त एक सामान्य मांजर नाही, तर एक शेफ आहे,

Video: जगातील पहिली मांजर शेफ, भन्नाट रेसिपी पाहून चांगले चांगले गार, नेटकरी म्हणाले, 'बाई, तूच काय ती सुगरण!'
या व्हिडीओंमध्ये ही मांजर काही ना काही बनवताना दिसते, मांजरीचा पेहरावही कुणाही शेफला लाजवेल असाच आहे.
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 04, 2021 | 6:54 PM
Share

इंटरनेटवर तुम्हाला मांजरींचे व्हिडीओ पाहायला मिळतील. बऱ्याच लोकांना मांजरींचे असे मजेदार आणि मनोरंजक व्हिडिओ पाहायला आवडतात, आता असाच एक मांजरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो नेटकऱ्यांना भलताच आवडलेला दिसतो आहे. बऱ्याच लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ टाकण्यासाठी सोशल मीडियावर त्यांचे अकाऊंट उघडले आहे, अशाच एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता आपण ज्या मांजरीबद्दल बोलत आहोत ती खूप लोकप्रिय आहे. कारण, ती फक्त एक सामान्य मांजर नाही, तर एक शेफ आहे, हो. कदाचित तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटलं असेल, पण या मांजरीचे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला तिच्या पाककलेची आठवण येईल. ( chef-cat-shows-how-to-make-delicious-food-watch-videos-here )

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाउंटवर thatlittlepuff नावाचं एक पेज आहे, ज्यावर असे मांजरींचे असे अनेक व्हिडीओ पोस्ट केलेले तुम्हाला पाहायला मिळतील. या व्हिडीओंमध्ये ही मांजर काही ना काही बनवताना दिसते, मांजरीचा पेहरावही कुणाही शेफला लाजवेल असाच आहे. आणि डोळ्यांबद्दलच तर विचारुच नका, एकदम अथांग समुद्राचा भास व्हावा असे निळेशार. ही पहिली फूट ब्लॉगर मांजर आहे. जी स्वत: सगळं काही बनवते.

पाहा व्हिडीओ:

अजून एक गोष्ट, व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटू शकतं हे मांजरीने बनवलं आहे. पण हे मांजरीने बनवलेलं नाही तर माणसानेंच बनवलं आहे, मनोरंजनाच्या उद्देशाने हे मांजरीला तिथं बसवून ते मांजरीने बनवलं आहे, असं भासवण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरी हे व्हिडीओ इतके क्युट आहेत, की मांजरप्रेमींना ते फार आवडत आहेत.

तुमच्या माहितीसाठी, जगभरात या मांजरांची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. 1 दशलक्षाहून अधिक लोकांना ही मांजर आवडते. मांजरीच्या पेजवर सुमारे 500 व्हिडिओ आहेत, ज्यात ती फक्त चांगले स्वयंपाक करताना दिसत आहे. कधीकधी मांजरीचे अन्न खूप चांगले होते, तर कधीकधी ते मांजरीचे अन्न खराब होते. हे मांजरीच्या बहुतेक व्हिडिओंमध्ये पाहिले जाऊ शकते, ती शेफसारखी तयार बसून काळजीपूर्वक आपले काम करत आहे.

हेही पाहा:

VIDEO: लाँग ड्राईव्हवर निघाल्या 3 मैत्रिणी, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, याच्यासारखा जुगाड पाहिला नाही!

Video| इंजिनवर पक्षी आदळताच विमानाने घेतला पेट, प्रवाशांचं काय झालं ? व्हिडीओ व्हायरल

 

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...