AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: लाँग ड्राईव्हवर निघाल्या 3 मैत्रिणी, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, याच्यासारखा जुगाड पाहिला नाही!

जुगाडांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरुन हसाल.

VIDEO: लाँग ड्राईव्हवर निघाल्या 3 मैत्रिणी, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, याच्यासारखा जुगाड पाहिला नाही!
जेव्हा कॅमेरा वाईड अँगलला जातो, तेव्हा दिसतं की ही तर कार नाही. ही एक बैलगाडी आहे.
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 04, 2021 | 5:43 PM
Share

आजकाल कोण काय करेल हे सांगता येत नाही, जुगाडूंची आपल्या देशात कमी नाही. जी गोष्ट भल्याभल्यांना शक्य होत नाही, तो गोष्ट भारतात जुगाडी लोक सहज करुन दाखवतात. असेच जुगाडांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरुन हसाल. शिवाय, हाही विचार कराल की, आपल्याकडे खरंच लोकं कुठं डोकं लावतील सांगता येत नाही. ( man-creates-weird-bullock-cart-car-by-the-help-of-desi-jugaad-video-goes-viral )

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यात 2 साडी नेसलेल्या महिला कुठेतरी फिरायला निघाल्याचं दिसतं. या तिघी कुणालातरी हात करत आलीशान कारच्या दरवाज्यापर्यंत येतात. त्यातील पहिली महिला दरवाजा उघडते, आणि कारमध्ये जाऊन बसते. नंतर दुसरी बसते आणि नंतर तिसरी. या तिघीही बाहेर असलेल्या आपल्या नातेवाईकांना बाय करताना दिसतात. हे पाहून वाटतं, या तिघी या कारमध्ये बसून कुठेतरी लॉंग टूरला निघाल्या असतील. पण तेवढ्यात, ही गाडी सुरु होते, आणि कॅमेरा वाईड अँगलला जातो. तेव्हा जे दिसतं ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहात नाही.

आधी व्हिडीओ पाहा:

जेव्हा या तिघीही गाडीत बसतात, तेव्हा कॅमेरा फक्त या तिघींवरच असतो, पण जेव्हा कॅमेरा वाईड अँगलला जातो, तेव्हा दिसतं की ही तर कार नाही. ही एक बैलगाडी आहे. या जुगाडू बैलगाडीवाल्याने कारचा मागचा भाग कापून, तो बैलगाडीला जोडला आहे. त्यामुळे मागून पाहिल्यानंतर ती कारच दिसते. या व्हिडीओवर लोक पोट धरुन हसताना दिसत आहेत, हे फक्त भारतातच होऊ शकतं असंही अनेकजण म्हणत आहेत, काहीजण त्यांच्याही गावातील जुगाड सांगत आहेत.

हा मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर chokhapunjab नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ गरज शोधाची जननी आहे म्हणतात, सध्या पेट्रोलचे भाव वाढल्याने कार परवडत नाही, म्हणूनच कारचा फील विनापेट्रोल घेण्यासाठी शोधलेला हा उपाय.

हेही वाचा:

Video: दिल्ली-गुरुग्राम रस्त्याच्या ब्रीजखाली एअऱ इंडियाचं विमान अडकलं, नेमकं सत्य काय?

Video: लग्नातच नवरा फुगला, नवरीही रागाने लाल, नवरी-नवऱ्याला मिठाई भरवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...