Video: लग्नातच नवरा फुगला, नवरीही रागाने लाल, नवरी-नवऱ्याला मिठाई भरवतानाचा व्हिडीओ व्हायरल

लग्नावेळी वधू आणि वर दोघेही आनंदात असतात, नवीन आयुष्याची ती एक सुरुवात असते. मात्र, सगळ्याच लग्नांमध्ये हे होताना दिसत नाही, सध्य़ा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरा मुलगा चिडलेला दिसतो आहे

Video: लग्नातच नवरा फुगला, नवरीही रागाने लाल, नवरी-नवऱ्याला मिठाई भरवतानाचा व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओमध्ये नवरा मुलगा चिडलेला दिसतो आहेत, नवरीचा चेहराही रागातच दिसतो आहे

इंटरनेटवर लग्न समारंभाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. त्यातच नवरा-नवरीचे व्हिडीओही चांगलेच पाहिले जातात, त्यामुळे लग्नातील काहीही किस्सा जेव्हा शेअर केला जातो, तेव्हा तो लगेच व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. ( viral-video-shows-groom-got-angry-before-jaimala-on-stage-she-how-bride-reacts )

लग्नावेळी वधू आणि वर दोघेही आनंदात असतात, नवीन आयुष्याची ती एक सुरुवात असते. मात्र, सगळ्याच लग्नांमध्ये हे होताना दिसत नाही, सध्य़ा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरा मुलगा चिडलेला दिसतो आहे, नवरीचा चेहराही रागातच दिसतो आहे. दरम्यान नवरी नवऱ्याला काहीतरी खाऊ घालण्याचा प्रयत्न करते आहे, मात्र नवरा ते काही खायला तयार नाही, नवरीही फुगलेली दिसते आहे, त्यामुळे तीही जास्त आग्रह करत नाही. आजूबाजूचे त्याला समजावत आहेत, मात्र नवरा मुलगा काही ऐकायला तयार नाही

आपण पाहू शकता की वधू वराला स्टेजवर मिठाई खायला देण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु वराला मिठाई खायची इच्छा नाही. तो पुन्हा पुन्हा डोके फिरवू लागतो. या दरम्यान, वधूचे भाव पाहून, हे समजू शकते की या प्रसंगी तिला कसे वाटत असावे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही वराच्या कृत्यावर रागावू शकतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काही सेकंदांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ekmohabbataisibhi नावाच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ 13 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. त्याचबरोबर, लोक यावर सतत कमेंट्सही करत ​​आहेत. एका ने कमेंट केली आहे की, भावाचं लग्न जबरदस्तीने लावल्यासारखं वाटतं आहे. त्याचवेळी, दुसर्‍याने लिहिलं की, असं वाटतं की तो गुटखा खात असणार, म्हणून त्याचं तोंड उघडत नाही.

हेही पाहा:

Video: लग्नात वराने वधूच्या हातात दिली बंदूक, फायरिंग केल्यानंतर काय घडलं पाहा!

Video | हवाई सुंदरीचा विमानात बहारदार डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

 

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI