Video | हवाई सुंदरीचा विमानात बहारदार डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ इंडिगओ एअरलाईन्सच्या विमानात शूट करण्यात आला आहे. या विमानात प्रवाशी नाहीत. कदाचित याच कारणामुळे हवाई सुंदरी विमानातच डान्स करत आहे. सोशल मीडियावर सध्या रिल्स तसेच शॉर्ट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात.

Video | हवाई सुंदरीचा विमानात बहारदार डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
air hostess viral video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Oct 03, 2021 | 9:51 PM

मुंबई : सोशल मीडियावप रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण थक्क होऊन जातो. लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्ध लोकांचे डान्स व्हिडीओ तर खास चर्चेचा विषय ठरतात. अशा व्हिडीओंना आवडीने पाहिले जाते. सध्या एका हवाईसुंदरीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हवाई सुंदरी ठुमकत ठुमकत डान्स करत आहे.

हवाई सुंदरीचा Touch It गाण्यावर डान्स

हा व्हिडीओ इंडिगओ एअरलाईन्सच्या विमानात शूट करण्यात आला आहे. या विमानात प्रवाशी नाहीत. कदाचित याच कारणामुळे हवाई सुंदरी विमानातच डान्स करत आहे. सोशल मीडियावर सध्या रिल्स तसेच शॉर्ट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. व्हिडीओतील हवाई सुंदरीदेखील शॉर्ट व्हिडीओ शूट करत आहे. तिने Touch It या व्हारल गाण्यावर डान्स केला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हवाई सुंदरी डान्स करत आहे. निळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये ती आहे. विमानात कोणीही नसल्यामुळे ती उत्स्फूर्तणे डान्स करतेय. तिच्या डोक्यावर टोपीदेखील आहे. टच इट गाण्यावर डान्स करताना तीच्या मैत्रिणीने व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. तिने ठुमके घेत केलेला डान्स नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. तसेच डान्स करताना तिने केलेले हावभाव तर नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. थेट विमानात हवाई सुंदरी डान्स करत असल्यामुळे नेटकरी या व्हिडीओला उत्सुकतेने पाहत आहेत. तसेच या व्हिडीओला शेअर करत लाईकही करत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर या व्हिडीओवर अतिशय मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इतर बातम्या :

Aryan Khan drug case | रेव्ह पार्टी-ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात, चर्चा मात्र एका वेगळ्या फोटोची, नेमका प्रकार काय ?

Video | 10 सेकंदाचा थरार, छोट्या मुलाचा स्टंट एकदा पाहाच !

Video | शाळेत मुलगी रांगेत उभी, माकडाने दिला अचाकनपणे धक्का, पुढे काय झालं ? एकदा बघाच

(air hostess dances in airplane on touch it viral song)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें