Video | शाळेत मुलगी रांगेत उभी, माकडाने दिला अचाकनपणे धक्का, पुढे काय झालं ? एकदा बघाच

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. व्हिडीओमध्ये एक माकड दुचाकीवर बसले आहे. त्याने शाळेतील एका मुलाली जोरात धक्का दिला आहे.

Video | शाळेत मुलगी रांगेत उभी, माकडाने दिला अचाकनपणे धक्का, पुढे काय झालं ? एकदा बघाच
monkey and girl

मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होतात. या मंचावर कधीकधी तरुण-तरुणी तसेच म्हाताऱ्या माणसांच्या वेगवेगळ्या करामती चर्चेचा विषय ठरतात. तर कधी या मंचावर एखाद्या प्राण्याची चर्चा होत असते. सध्या एका माकडाच्या करामतीमुळे समाजमाध्यमांवर हशा पिकला आहे. या व्हिडीओमध्ये एका माकडाने अजब करामत केली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच चकित झाले आहेत.

माकडाने मुलीला थेट धक्का दिला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. व्हिडीओमध्ये एक माकड दुचाकीवर बसले आहे. त्याने शाळेतील एका मुलाली जोरात धक्का दिला आहे. या घटनेमुळे तिच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या मुली चकित होऊन पाहत आहेत.

व्हिडीओमध्ये नेमके काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही मुली रांगेत उभ्या आहेत. कदाचित शाळेची प्रार्थना असावी. मुलींच्या थोड्या अंतरावर एका दुचाकीवर एक माकड बसले आहे. माकड सुरुवातीला शांतपणे उभे असल्याचे दिसत आहे. नंतर काही वेळाने त्याने झेप घेतली आहे. खाली उडी मारून पळत जात त्याने त्याच्याकडे पाठ उभी करुन असलेल्या मुलीला धक्का दिल्ला आहे. हा धक्का खूपच जोराचा आहे. माकडाने दिलेल्या धक्क्यामुळे मुलगी थेट जमिनीवर कोसळली आहे. तर हा प्रकार पाहून दुसऱ्या मुली थक्क झाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून खळखळून हसत आहेत. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे काही लोकांनी खाली पडलेल्या मुलीप्रती संवेदना व्यक्त केल्या असून हा व्हिडीओ तुम्हाला इन्स्टाग्रामवर epic69 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळेल.

इतर बातम्या :

Video | टिकटॉकवर व्हिडीओ बनवण्याची तरुणीला हौस, पण मध्येच घोळ झाला, नेटकरी हसून लोटपोट

बेबी लायन टामरिनच्या सुटकेचा व्हिडीओ व्हायरल,आई आणि लेकरांचं प्रेम पाहून नेटकरी भावूक

जेव्हा जंगलाचा राजा चालता चालता पाण्यात पडतो… पाहा मजेदार Video

(monkey hit girl in school funny video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI