AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्र जवळचा असतो पण इतका..आई-वडिलांना एक छदामही न देता 19 वर्षाच्या मुलाने मित्राच्या नावावर केली 28 कोटींची संपत्ती

माणसाच्या आयुष्यात अनेक नाती असतात. काही नाती ही खूप खास असतात. पण रक्ताच्या नात्याला माणूस महत्व देतो. पण एका मुलाने आई-वडिलांपेक्षा मित्र किती जवळचा आहे ते दाखवून दिलय. यात विषय पैसा, संपत्तीचा आहे.

मित्र जवळचा असतो पण इतका..आई-वडिलांना एक छदामही न देता 19 वर्षाच्या मुलाने मित्राच्या नावावर केली 28 कोटींची संपत्ती
Property
| Updated on: Jul 13, 2026 | 12:39 PM
Share

जगात बहुतांश लोक आपली संपत्ती, पैसा अडका, कमाई, दागिने आपले जवळचे सख्खे नातेवाईक, वंशजांच्या नावावर करतात. पण 19 वर्षांचा एक मुलगा अपवाद ठरला आहे. त्याने आपली सगळी संपत्ती बालपणीच्या मित्राच्या नावावर केली. चीनमध्ये राहणाऱ्या ली ने बालपणीच्या मित्रावर विश्वास दाखवला. या निर्णयामुळे ली चर्चेमध्ये आहे. त्याचं वय अवघं 19 वर्ष आहे. या वयात बहुतांश लोकांना शिक्षण, करिअर आणि भविष्याची चिंता असते. पण ली आपल्या मित्राची जास्त काळजी होती. ली चीनच्या शंघाई शहरात राहतो. त्याने जवळ 2 कोटी युआन म्हणजे जवळपास 28 कोटी रुपयांची संपत्ती बालपणीच्या मित्राच्या नावावर केली. त्याने आपलं इच्छापत्र रजिस्टर्ड केलं आहे. ली च्या प्रॉपर्टीमध्ये एक अपार्टमेंट आणि बँकेमध्ये जमा रक्कमेचा समावेश आहे.

ली ला एडवेंचर आणि एक्सट्रीम स्पोर्ट्सची आवड आहे. अशा खेळांमध्ये रिस्क जास्त असते. म्हणून त्याने ठरवलय की, त्याच्यासोबत कुठली दुर्घटना घडली तर त्याची संपत्ती कोणाला मिळाली पाहिजे. आई-वडिलांच्या जोडीदाराला त्याच्या संपत्तीचा फायदा मिळू नये अशी त्याची इच्छा होती. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनी पुन्हा नव्याने संसार थाटला आहे. ली चं त्याच्या आई-वडिलांच्या विद्यमान जोडीदारांना आपल्या कुटुंबाचा भाग मानत नाही. म्हणून त्याने सगळी संपत्ती मित्राच्या नावावर केली आहे. या मित्रावर त्याचा प्रचंड विश्वास आहे.

वेळेत क्लेम केला नाही, तर..

चीनच्या उत्तराधिकारी कायद्यानुसार, जर एखादा व्यक्ती अविवाहित आहे, त्याला मुलं नाहीयत, तर सामान्य परिस्थितीत आई-वडिल कायदेशीर उत्तराधिकारी ठरतात. पण कोणा व्यक्तीने कायदेशीरदृष्ट्या वैध इच्छापत्र तयार केलं, तर तो कुटुंबाबाहेर कोणाच्या नावावरही ती संपत्ती करु शकतो. रिपोर्टनुसार, ली ने शंघाई येथील चायना विल रजिस्ट्रेशन सेंटरमध्ये आपल्या इच्छापत्राची नोंदणी केली आहे. नियमांनुसार इच्छापत्रामध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे, त्याने संबंधिताच्या मृत्यूनंतर 60 दिवसांच्या आत संपत्ती स्वीकारायची असते. वेळेत क्लेम केला नाही, तर तो अधिकार गमावू शकतो.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक