AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“फोटोसाठीच अट्टाहास माझा”, लसीकरण करताना मास्क काढल्याने काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

मोदींनी कोरोना लसीकरणादरम्यान फोटो काढण्यासाठी मास्क काढल्याने काँग्रेसने त्यांच्यावर हल्ला चढवलाय.

फोटोसाठीच अट्टाहास माझा, लसीकरण करताना मास्क काढल्याने काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल
मेरियम-वेबस्टर डिक्शनरीचे संपादक पीटर सोकोलोव्स्की यांच्या मते, 'व्हॅक्सिन' वर्षाचा शब्द म्हणून निवडण्याची दोन कारणे आहेत. पहिलं म्हणजे जगभरातील लोकांना लसीचे महत्त्व समजले आणि दुसरे कारण म्हणजे लसीकरणाबाबतचा वाद. महत्त्वाच्या बाबींवर याचा शोध, यावरची चर्चा वाढत गेली.
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 01, 2021 | 8:46 PM
Share

मुंबई : देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आज (1 मार्च) सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लस घेतली. तसेच आपला फोटो ट्विट करत याबाबत माहिती दिली. मात्र, मोदींनी कोरोना लसीकरणादरम्यान फोटो काढण्यासाठी मास्क काढल्याने काँग्रेसने त्यांच्यावर हल्ला चढवलाय. याशिवाय सोशल मीडियातूनही त्यांच्यावर टीका होतेय. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी मोदींचा फोटोसाठीच अट्टाहास असल्याची टीका केलीय (Congress criticize PM Narendra Modi for removing Mask while Corona Vaccination).

राजू वाघमारे यांनी मोदींचा लसीकरण घेतानाचा फोटो ट्विट करत म्हटलं आहे, “कोरोनाची लस घेण्यासाठी कोरोनाचा “मास्क” नाही? रवींद्रनाथ टागोर छबीसाठी “मास्क” घातला नाही? फोटोसाठीच अट्टाहास माझा!”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विट खाली काही युजर्स जसा मास्कबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. काहींनी तर अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष जो बायडन यांचा कोरोना लस घेतानाचा फोटो ट्विट करत त्यांची आणि मोदींची तुलना केलीय. तर काहींनी मोदींनी फोटो घेण्यासाठी मास्क काढल्याने त्यांना फोटोजीवी म्हणून टोलाही लगावला. तसेच काही जण त्यांना रोजगाराविषयी देखील प्रश्न विचारत आहेत.

दुसरीकडे मोदींच्या समर्थकांकडून त्यांचं कौतुकही होत आहे. मोदींनी स्वतः कोरोना लस घेऊन देशवासीयांना प्रोत्साहन दिलंय. तसेच कोरोना लसीला विरोध करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिल्याचीही भावना काही युजर्स व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

‘राजकारणी जाड कातडीचे, जनावरांची सुई वापरणार आहात का?’ मोदींना लस टोचता टोचता नर्स खुदूखुदू हसली

‘मोदी हिंदू निष्ठेचे ढोल बडवतात, पण हिंदू नर्सेसवर त्यांचा विश्वास नाही’, लसीकरणावरुन आंबेडकरांची खोचक टीका

‘राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या नेत्यांना कोरोना नियम शिकवा’, मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला

व्हिडीओ पाहा :

Follow Us
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....