‘मोदी हिंदू निष्ठेचे ढोल बडवतात, पण हिंदू नर्सेसवर त्यांचा विश्वास नाही’, लसीकरणावरुन आंबेडकरांची खोचक टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली वेशभुषा, त्यांचा वावर आणि काही योगायोगाने घडलेल्या (?) गोष्टींवरुन सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींवर जोरदार टीका केलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:05 PM, 1 Mar 2021
'मोदी हिंदू निष्ठेचे ढोल बडवतात, पण हिंदू नर्सेसवर त्यांचा विश्वास नाही', लसीकरणावरुन आंबेडकरांची खोचक टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. मोदींनी लस टोचून घेतल्यानंतर देशभरातील अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ नेत्यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली वेशभुषा, त्यांचा वावर आणि काही योगायोगाने घडलेल्या (?) गोष्टींवरुन सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींवर जोरदार टीका केलीय.(Prakash Ambedkar’s criticism of PM Narendra Modi)

“पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसेंदिवस हिंदू निष्ठेचा ढोल बडवत असतात. पण त्यांचा हिंदू नर्सेसवर विश्वास नाही. त्यांनी ख्रिश्चन नर्सकडून कोरोना लस टोचून घेतली. काय वर्तन आहे”, असं ट्वीट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या ट्वीटमुळे आता जोरदार राजकारण रंगलं आहे. सोशल मीडियातही आंबेडकरांच्या ट्वीटवर मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

पुद्दुचेरी आणि केरळच्या नर्सेसनी मोदींना लस टोचली

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी लस टोचली तेव्हा त्यांनी गळ्यात आसामी पद्धतीचा गमचा घातला होता. हा गमचा म्हणजे आसाममधील महिलांच्या आशीर्वादाचे प्रतिक मानला जातो. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या नर्सेसकडून कोरोना लस टोचण्यात आली त्यांचीही बरीच चर्चा सुरु आहे. यापैकी पी. निवेदा या पुदुचेरीच्या आहेत. तर दुसरी नर्स ही केरळमधील होती. या नर्सेसनी मोदींना लस टोचून काहीवेळ त्यांच्यावर देखरेख ठेवली.

स्वदेशी लसीला प्राधान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या राजकारणात प्रखर राष्ट्रवाद हा फॅक्टर नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. सर्जिकल स्ट्राईकपासून ते अगदी शेतकरी आंदोलनातील परकीय सेलिब्रिटींच्या हस्तक्षेपाला विरोध करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी ‘राष्ट्र प्रथम’ हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.

आतादेखील त्यांनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ (Covaxine ) या स्वदेशी लशीला प्राधान्य दिले. सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्हिशील्ड’च्या तुलनेत ‘कोव्हॅक्सिन’मुळे साईड इफेक्टस होण्याची जास्त शक्यता आहे, असा गैरसमज सध्या अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात ‘कोव्हॅक्सिन’चा दर्जा आणि सुरक्षिततेविषयी शंका होत्या. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सिन ही देशी लस घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता.

संबंधित बातम्या :

VIDEO: आसामचा गमचा, पुद्दुचेरी-केरळच्या नर्स, चेहऱ्यावर स्माईल, मोदी आहेत तर चर्चा होणारच!

‘राजकारणी जाड कातडीचे, जनावरांची सुई वापरणार आहात का?’ मोदींना लस टोचता टोचता नर्स खुदूखुदू हसली

Prakash Ambedkar’s criticism of PM Narendra Modi