व्हिडिओ पाहून लोकांचं मन हेलावलं, जीव मुठीत घेऊन काम करत होते मजूर!

| Updated on: Mar 16, 2023 | 5:40 PM

सध्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मजुरांच्या स्थितीची आपण क्वचितच चर्चा करतो. एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने इमारतीवर काम करणाऱ्या काही मजुरांचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आणि लिहिलं...

व्हिडिओ पाहून लोकांचं मन हेलावलं, जीव मुठीत घेऊन काम करत होते मजूर!
Majur working
Image Credit source: Social Media
Follow us on

भारतातले अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मग ते कुठल्या लोकल मधले असोत, कुठचे रोडवरचे असोत किंवा अजून कुठचे असोत. लोक सुद्धा असे व्हिडीओ व्हायरल करत असतात. विशेष म्हणजे आपल्याकडच्या मजूरवर्गाचे व्हिडीओ प्रचंड शेअर होत असतात. परदेशातल्या लोकांना याचं विशेष आकर्षण असतं. सध्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरक्षेची कोणतीही साधने नसताना काम करताना पाहून लोकं चांगलीच हादरली आहेत. मजुरांच्या स्थितीची आपण क्वचितच चर्चा करतो. त्यांच्या सुरक्षिततेकडे क्वचितच गांभीर्याने पाहिले जाते, ज्यामुळे अनेक दुर्दैवी अपघात आणि बांधकामाच्या ठिकाणी घटना घडतात.

एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने इमारतीवर काम करणाऱ्या काही मजुरांचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आणि लिहिलं- “भारतीय बांधकाम कामगार खूप धाडसी आहेत, पण मला वाटतं त्यांना युनियनची गरज आहे जेणेकरून ते साइटवर स्वतःसाठी सुरक्षेची मागणी करू शकतील. यात 9 मजले असून 9 मजले होणं बाकी आहे.”

सुरक्षिततेचा मुद्दा हा खरं तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. व्हिडीओ पाहताना तर ते अधिकच जाणवतं. जराही जीवाची पर्वा न करणारे हे मजूर नेमक्या काय मनस्थितीत हे काम करत असतील देवच जाणे. व्हिडीओ पाहताना माणूस म्हणून वाईट वाटतं आणि भारतीय लोक किती धाडसी आहेत याचाही एक अंदाज येतो.