कामापेक्षा ऑफिसमध्ये अफेअर्सच जास्त; डोकं चक्रावणारा किस्सा, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल
ऑफिसमध्ये कामापेक्षा अफेअर्स जास्त; तरुणीने सांगितला कसा असतो हा सगळा गेम? Video तुफान चर्चेत... कॉरपोरेट लाईफचं मोठं सत्य व्हिडीओच्या माध्यमातून समोर...

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी मेट्रो प्रवासादरम्यान तिला आलेला अनुभव सांगताना दिसत आहे. अनुभव शेअर करताना तरुणीने कॉरपोरेट लाईफ आणि अफेयरवर निशाणा साधला… तरुणी सांगते, मेट्रोमध्ये प्रवास करत असताना एक महिला तिच्या बाजूला बसलेली आणि फोनवर कोणाशी तरी बोलत होती. सुरुवातीला महिलाचा आवाज मृदू आणि मैत्रीपूर्ण होता. त्या व्यक्तीचं नाव सचिन सर होतं. नाव घेताना त्यांच्या आवाजातील गोडवा स्पष्टपणे दर्शवत होता की हे नातं केवळ व्यावसायिकतेपेक्षा जास्त होते. दोघांमध्ये ऑफिसनंतर बाहेर फिरण्यासाठी आणि एकत्र वेळ व्यतीत करण्याची चर्चा रंगली होती… सर्वकाही इतकं सहज होतं की, ऐकणारा देखील ऐकत बसेल… पण कथेत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा महिलेच्या पतीचा फोन आला आणि तिच्या बोलण्याचा सूर एका क्षणात बदलून गेला.
आता त्या महिलेच्या आवाजात कोणत्याच प्रकारच्या मृदू भावना नव्हत्या.. हे दृश्य पाहिल्यानंतर तरुणीला देखील मोठा धक्का बसला… एक व्यक्ती असं दोन्ही बाजूंनी कसं बोलू शकते.. असा प्रश्न त्या तरुणीला पडला.. एक महिला, दोन व्यक्ती आणि दोन बिलकूल वेगळे चेहरे… पण गोष्टी याठिकाणी संपत नाही… सचीन सर देखील विवाहित असल्याचं तरुणीला कळंल आणि दोघे मोठ्या हुशारीने त्यांचे प्लान करत होते.
देघांमध्ये आजू-बाजूला फिरण्याची चर्चा होत होती. म्हणजे घरी कोणाला संशय येणार नाही. महिलेच्या पतीला आणि सरांच्या पत्नीला सर्वकाही सामान्य आहे असं वाटेल. याची देखील काळजी घेण्यात येते, की कोणाच्या कुटुंबियांना यामधील काही कळायला नको. जर असं झालं तर, दोघांच्या वैवाहिक आयुष्यात मोठं संकट येईल.
If people focused on their jobs half as much as their secret office romances, everyone would be rich. pic.twitter.com/wKg76xaJ0L
— Rajveer (@RajveerIND) January 7, 2026
सांगायचं झालं तर, एक्सवर @RajveerIND या नावाच्या अकाउंटवरून तरुणीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विनोदी नाही, तर शहरी भागातील राहणीमान सांगत आहे.. विशेषतः कॉरपोरेट कल्चरचं….
कॉरपोरेट कल्चरमध्ये नाती हळूहळू मैत्रीच्या पलिकडे जातात. प्रत्येक गोष्टी प्लानिंग केली जाते. प्रत्येक पाऊल मोठ्या विचार करून ठेवण्यात येतो. पण यासर्व प्रकरणात विश्वास हारतो… कोणत्याही नात्याचं मूळ हे विश्वासावर आधारलेलं असतं… अखेर विश्वासाला तडा जातो आणि अनेक वर्ष जपलेली नाती नव्या लोकांमुळे खराब होतात.
