VIDEO | गायीची काळजी घेण्यासाठी महिला सरसावली; हात लावला अन् भलतंच घडलं, व्हिडीओ व्हायरल

एक महिला मोठ्या आत्मियतेने गायीच्या जवळ गेलीये मात्र त्यानंतर भलतंच घडलंय. या महिलेची चांगलीच फजिती उडालीये. (cow kicked women video)

VIDEO | गायीची काळजी घेण्यासाठी महिला सरसावली; हात लावला अन् भलतंच घडलं, व्हिडीओ व्हायरल
गायीने अशा प्रकारे महिलेला लाथ मारली.

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. प्राणी, पक्ष्यांविषयीचे व्हिडीओ तर मोठ्या चविने पाहिले जातात. छोट्या आणि क्युट अशा प्राणी-पक्ष्यांच्या व्हिडीओंना समाजमाध्यमावर लाखोंनी लाईक्स मिळतात. कधीकधी प्राण्यांमधील ममत्वसुद्धा आपल्याला अनेक व्हिडीओंमधून पाहायला मिळते. मात्र, सध्या एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. एक महिला मोठ्या आत्मियतेने गायीच्या जवळ गेलीये मात्र त्यानंतर भलतंच घडलंय. या महिलेची चांगलीच फजिती उडालीये. (Cow kicked women video goes viral)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

बहुतांश लोकांना प्राणी, पक्षी आवडतात त्यामुळे अनेकजण घरात वेगवेगळे प्राणी पाळतात. या प्राण्यांची काळजी ते मनोभावे करतात. मात्र, हेच प्राणी कधीकधी माणसामील ममत्व ओळखण्यास कमी पडतात. माणसांकडून आपल्याला धोका आहे; असे समजून प्राणी कित्येकवेळा माणसांवर थेट हल्ला करतात. असंच काहीसं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडीओतील गायीने महिलेला थेट लाथ मारली आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे, गायीला तपासणारी महिला ही डॉक्टर असावी असे वाटते. गायीने नुकतंच एका वासराला जन्म दिल्यामुले ही महिला तिच्या तपासणीसाठी आली असावी. मात्र, ही महिला जेव्हा गायीला तपासण्यासाठी हात लावते, त्यावेळी गायीने महिलेवर थेट हल्ला केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. गायीने महिलेच्या तोंडावर थेट पाय मारला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे या महिलेची चांगलीच फजीती उडालीये. गायीने पाय मारल्यामुळे ही महिला थेट खाली पडलीये.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. लाईन अँड नेचर या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Suez canal | सुएझ कालव्यातील जहाज काही निघेना; नेटकरी म्हणतात बाहुबलीला बोलवा, भन्नाट मीम्स व्हायरल

Video | ‘तेनु ले के मै जावांगा, दिल दे के मै जावांगा’,  होणाऱ्या बायकोसाठी नवऱ्याचा अफलातून डान्स, पाहा व्हिडीओ…

Video | रेल्वेस्थानकामध्ये शिरला महाकाय हत्ती; पुढे जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही, पाहा व्हिडीओ

(Cow kicked women video goes viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI