Viral Video : वृद्ध दाम्पत्यामधील क्युट प्रसंग इंटरनेटवर व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘याला म्हणतात खरं प्रेम’

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वयाच्या नव्वदीतलं वृद्ध जोडपं ट्रेनमध्ये एकत्र बसलेले दिसतं. या दरम्यान, वृद्ध स्त्री आपल्या पतीशी ज्या पद्धतीने बोलते ते पाहण्यासारखे आहे.

Viral Video : वृद्ध दाम्पत्यामधील क्युट प्रसंग इंटरनेटवर व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'याला म्हणतात खरं प्रेम'
वृद्ध जोडप्याला बोलताना पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच स्मितहास्य येईल.

सोशल मीडियावर तुम्हाला अनेक मजेदार कपल व्हिडीओ पाहायला मिळतील. यातील एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ दररोज व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ असे आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्ही खूप भावुक होतात, तर काही असे असतात जे पाहिल्यानंतर तुम्हाला खूप आनंद मिळतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वयाच्या नव्वदीतलं वृद्ध जोडपं ट्रेनमध्ये एकत्र बसलेले दिसतं. या दरम्यान, वृद्ध स्त्री आपल्या पतीशी ज्या पद्धतीने बोलते ते पाहण्यासारखे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरा नेटकऱ्यांनाना खूप आवडला आहे. ( Cute video of an elderly couple talking to each other goes viral )

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ फक्त काही सेकंदांचा आहे, पण वृद्ध जोडप्याला बोलताना पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच स्मितहास्य येईल. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही असेही म्हणाल की, खरे प्रेम कधीच संपत नाही.

आधी व्हिडीओ पाहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

व्हायरल व्हिडीओ क्लिप पाहून असे दिसते की वृद्ध जोडपे ट्रेनमध्ये प्रवास करत आहेत. या दरम्यान, वृद्ध स्त्री ज्या पद्धतीने आपल्या पतीशी हसत आणि सतत बोलत असल्याचे दिसते, ते पाहण्यासारखे आहे. ती महिला खूप आनंदी आहे आणि तिच्या पतीला काहीतरी सांगत आहे. दरम्यान, वृद्ध पतीसुद्धा हसत हसत बायकोचे शब्द ऐकतो आणि सतत तिच्याकडे पहात राहतो.

वृद्ध दाम्पत्यामधील हे सुंदर संभाषण ट्रेनमध्येच बसलेल्या दुसऱ्या प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वृद्ध जोडप्याच्या गोंडसपणाचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. युजरने व्हिडिओमध्ये कॅप्शन दिले आहे, खरं प्रेम कधीच संपत नाही. सोशल मीडियावर नेटकऱ्यांना हे गोंडस जोडपं खूप आवडत आहे.

हेही वाचा:

Viral Video : बेबी पांडाचा क्युट व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरही हसू फुलेल

Video | भर रस्त्यात भन्नाट डान्स, देशी मायकल जॅक्सनच्या व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI