Video | भर रस्त्यात भन्नाट डान्स, देशी मायकल जॅक्सनच्या व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा

. सध्या असाच एक माणूस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या माणसाला देशी मायकल जॅक्शन म्हणत नेटकरी त्याचा व्हिडीओ आनंदाने पाहत आहेत.

Video | भर रस्त्यात भन्नाट डान्स, देशी मायकल जॅक्सनच्या व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा
DANCE VIDEO

मुंबई : आपल्या देशात टॅलेन्टला कमी नाही. वेगवेगळ्या करामती करुन लोकांचे मन जिंकणारे लोक आपल्या देशात बरेच आहेत. कित्येक लोक तर डान्स करुन रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत. सध्या असाच एक माणूस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या माणसाला देशी मायकल जॅक्शन (michael jackson) म्हणत नेटकरी त्याचा व्हिडीओ आनंदाने पाहत आहेत. (man dancing like michael jackson video went viral on social media)

माणसाचा डान्स पाहून भलेभले अवाक्

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र नेटकरी हा व्हिडीओ मोठ्या आवडीने पाहत आहेत. त्याची डान्स करण्याची पद्धत पाहून सगळेच अवाक झाले आहेत. अंगावर अगदीच साधारण कपडे असले तरी हा माणसू चांगलाच अवलिया आहे. हा माणूस एका रस्त्यावर उभे राहत डोळे दीपवणारा डान्स करत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

कशाचाही पर्वा न करता रस्त्यावरच करतोय डान्स

माणसू ज्या ठिकाणी डान्स करत आहे, त्याच्या आजूबाजूला छोटी मुलं आहेत. ही मुलं टाळ्या वाजून त्याला प्रोत्साहित करत आहेत. तसेच काही मुलं त्याच्यासोबत नाचण्याचासुद्धा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे त्याच्या मागे सायकल तसेच इतर वाहनं येत-जात आहेत. तरीसुद्धा कशाचीही पर्वा न करता हा माणूस मजेदार डान्स करतोय.

सोशल मीडियावर माणसाची एकच चर्चा

विशेष म्हणजे हा माणूस प्रसिद्ध डान्सर मायकल जॅक्सनच्या डेंजरस या गाण्यावर थिरकत आहे. कदाचित याच कारणामुळे नेटकरी त्याला देशी मायकल जॅक्सन असं म्हणत आहेत. या माणसाचा व्हिडीओ तुम्हाला इन्स्टाग्रामवर bhutni_ke_memes या अकाऊंटवर पाहायला मिळेल.

इतर बातम्या :

ढोलकी, पेटी अन् शिट्ट्या, मनी हाईस्टच्या ‘बेला चाओ’चे देशी व्हर्जन तुफान व्हायरल

Video | काही क्षणात बोहल्यावर चढणार, पण पाणीपुरी सोडली नाही, नवरीची सोशल मीडियावर एकच चर्चा

महिलेच्या सूचनांचं खारुताईकडून जसच्या तसं पालन, फटाफट संपवले बदाम, व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

(man dancing like michael jackson video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI