ढोलकी, पेटी अन् शिट्ट्या, मनी हाईस्टच्या ‘बेला चाओ’चे देशी व्हर्जन तुफान व्हायरल

बेला चाओ हे खास गाणे तर प्रत्येकाच्या तोंडावर आहे. याच गाण्याचे एक देशी व्हर्जन सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ढोकली आणि पेटीच्या तालावर गायलेलं बेला चाओ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

ढोलकी, पेटी अन् शिट्ट्या, मनी हाईस्टच्या 'बेला चाओ'चे देशी व्हर्जन तुफान व्हायरल
money heist song

मुंबई : मनी हाईसच्या या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. या वेब सीरिजचे सर्व भाग लोकांनी रात्र रात्र जागून पाहिले आहेत. या सीरिजमधील कलाकार भारतीय नसले तरी त्यांचे आपल्या देशात लाखोंनी चाहते आहेत. त्यातही बेला चाओ हे खास गाणे तर प्रत्येकाच्या तोंडावर आहे. याच गाण्याचे एक देशी व्हर्जन सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ढोकली आणि पेटीच्या तालावर गायलेलं बेला चाओ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

मनी हाईस्टचे देशी व्हर्जन व्हायरल

गुजरातमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात बेला चाओ हे गाणं गायलं गेलं आहे. या गाण्याची लोकांनी खास फर्माईश केली होती. लोकांच्या आग्रहामुळे गायकाने पेटी वाजवत बेला चाओ गाणं गायलं आहे. विशेष म्हणजे पेटी, ढोलकी, तबला तसेच इतर भारतीय वाद्यांच्या मदतीने बेला चाओची धून वाजवण्यात आली आहे. याच वाद्यांच्या मदतीने गायकाने बसून बेला चाओ हे गाणं गायलं आहे. बेला चाओ हे गीत गाताच समोर बसलेले लोक मोठ्या उत्साहात नाचत आहेत. या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं आपल्याला दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Patil Nik’s (@niks_music143)

हा व्हिडीओ गुजरात राज्यातील असला तरी तो नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. तसेच मजेदार कमेंट्सचा तर पाऊस पडला आहे. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर niks_music143 या अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video | काही क्षणात बोहल्यावर चढणार, पण पाणीपुरी सोडली नाही, नवरीची सोशल मीडियावर एकच चर्चा

Video | वरात मंडपात आली अन् मेहुण्यांनी अडवले, पैसे मागताच नवरदेवाने दिले भन्नाट उत्तर, व्हिडीओ व्हायरल

महिलेच्या सूचनांचं खारुताईकडून जसच्या तसं पालन, फटाफट संपवले बदाम, व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI