Video | काही क्षणात बोहल्यावर चढणार, पण पाणीपुरी सोडली नाही, नवरीची सोशल मीडियावर एकच चर्चा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. कारण या व्हिडीओमध्ये काही क्षणांत लग्न सोहळा सुरु होणार असला तरी नवरी मजेत पाणीपुरी खात आहे. नवरी नटून-थटून उभी असल्याचे आपल्याला दिसत आहे.

Video | काही क्षणात बोहल्यावर चढणार, पण पाणीपुरी सोडली नाही, नवरीची सोशल मीडियावर एकच चर्चा
BRIDE VIRAL VIDEO

मुंबई : लग्न म्हटलं की धमाल आलीच. कसलाही संकोच न करता आजकाल नवरी आणि नवरदेव सोबतच मस्ती करताना आपल्याला दिसतात. नव्या जोडीच्या मस्तीचे मजेदार व्हिडीओ आपण यापूर्वीदेखील पाहिले असतील. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ मात्र अकदीच वेगळा आणि मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नव्हे तर नवरी ‘खुले के’ जगत आहे. काही क्षणांत बोहल्यावर चढणार असली तरी कसलीही चिंता न करता नवरी आनंदात पाणीपुरी खात आहे. (bride eating panipuri before marriage video went viral on social media)

लग्न सोडून नवरीने पाणीपुरीवर ताव मारला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. कारण या व्हिडीओमध्ये काही क्षणांत लग्न सोहळा सुरु होणार असला तरी नवरी मजेत पाणीपुरी खात आहे. नवरी नटून-थटून उभी असल्याचे आपल्याला दिसत आहे. नवरीचा साज चढवल्यामुळे आता लगेच तिला बोहल्यावर चढावं लागणार आहे. पण मध्येच तिला पाणीपुरी दिसली आहे. मग काय, कशाचीही चिंता न करता या नवरीने पाणीपुरीवर ताव मारला आहे. लग्न होत राहील पण अगोदर पाणीपुरीची चव चाखली पाहिजे असे म्हणत नवरी पाणीपुरी खात आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाणीपुऱीची चव चाखताच नवरीची मंडपाकडे धाव 

एक पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर तिला झालेला आनंद पाहण्यासारखा आहे. नंतर पुढच्याच क्षणी नवरी लग्नमंडपाकडे धावत सुटली आहे. कदाचित नवरीने लवकरात लवकर यावं अशी सूचना करण्यात आली असावी. नवरी मंडपाकडे पळत असल्याचे आपल्याला दिसत आहे. हा मजेदार व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by WedAbout.com (@wedabout)

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स 

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही. पण नवरीचे पाणीपुरीवर असलेले प्रेम आणि लग्नातील गडबड पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेदार भाष्य केले आहे. काही नेटकऱ्यांनी तर समर्पक कॅप्शन देत हा व्हिडीओ वेगवेगळ्या माध्यमांवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुम्हाला इन्टाग्रामवर wedabout या अकाऊंटवर पाहायला मिळेल.

इतर बातम्या :

Video | वरात मंडपात आली अन् मेहुण्यांनी अडवले, पैसे मागताच नवरदेवाने दिले भन्नाट उत्तर, व्हिडीओ व्हायरल

गोंडस कुत्र्याची दाढी आहे जमिनीपर्यंत लांब, मालकीणबाई दररोज तासभर विंचरतात Teddy Dog चे केस

महिलेच्या सूचनांचं खारुताईकडून जसच्या तसं पालन, फटाफट संपवले बदाम, व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

(bride eating panipuri before marriage video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI