सांगलीच्या भंगारातील खुर्ची थेट इंग्लंडच्या कॅफेत ! मंडपवाल्या बाळू लोखंडेची एकच चर्चा, गमतीदार प्रवास नेमका कसा झाला ?

एक अतिशय मजेदार घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील बाळू लोखंडे या मंडप व्यावसायिकाच्या भंगार म्हणून विकलेल्या खुर्च्या थेट इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये वापरल्या जात आहेत.

सांगलीच्या भंगारातील खुर्ची थेट इंग्लंडच्या कॅफेत ! मंडपवाल्या बाळू लोखंडेची एकच चर्चा, गमतीदार प्रवास नेमका कसा झाला ?
SANGLI BALU LOKHANDE

मुंबई : मराठमोळी माणसं काधी काय करतील याचा नेम नाही. काही मराठी लोक तर अतिशय कुशाग्र असून त्यांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर विदेशातदेखील आपला महाराष्ट्राचा झेंडा फडकवलेला आहे. पण सध्या मात्र एक अतिशय मजेदार घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील बाळू लोखंडे या मंडप व्यावसायिकाच्या भंगार म्हणून विकलेल्या खुर्च्या थेट इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये वापरल्या जात आहेत. (mandap decorators balu lokhande sangli chairs found in england manchester face see viral video)

मँचेस्टरमध्ये  सांगलीतील बाळू लोखंडेंच्या खुर्च्या

बाळू लोखंडे असे नाव असलेल्या एका लोखंडी खुर्चीचा व्हिडीओ क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. लेले यांनी हा व्हिडीओ शेअर करताच मँचेस्टरमध्ये बाळू लोखंडे यांच्या खुर्च्या काय करत आहेत ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. इंग्लंडसारख्या देशात सांगलीमधील बाळू लोखंडे यांच्या खुर्च्या वापरल्या जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. लेले यांनी उत्सुकतेपोटी हा व्हिडीओ शेअर केला असला तरी नेटकरी वेगवेगळे प्रश्न विचारत होते.

बाळू लोखंडेंच्या खुर्च्या इंग्लंडमध्ये कशा गेल्या ?

बाळू लोखंडे असं नाव असलेल्या खुर्च्या मँचेस्टरसारख्या चकचकित भागात कशा आल्या ? असा प्रश्न विचारला जात होता. सखोल चौकशी केल्यानंतर लोखडेंची खुर्ची इंग्लंडमध्ये कशी पोहोचली याचा मजेदार किस्सा समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील सावळज गावात बाळू लोखंडे नावाचे ग्रहस्त आहेत. मागील कित्येक वर्षांपासून ते मंडप डेकोरेटर्स म्हणून काम पाहतात. तब्बल तेरा वर्षांपूर्वी त्यांनी जुन्या खुर्च्या भंगारामध्ये विकायला काढल्या होत्या. या जुन्या खुर्च्या विकून त्यांनी प्लास्टिकच्या खुर्च्या खरेदी केल्या.

विकलेल्या खुर्च्या थेट इंग्लंडला पोहोचल्या

नंतर याच लोखंडी खुर्च्या थेट इंग्लंडमध्ये पोहोचल्या. इंग्लंडमधील एका व्यावसायिकाने या खुर्च्या खरेदी केल्या होत्या. नंतर या खुर्च्याांवर एका हॉटेल व्यावसायिकाची नजर पडली. या हॉटेल व्यावसायिकाने वापरण्यायोग्य असलेल्या एकूण 15 खुर्च्या खरेदी केल्या होत्या. तेव्हापासून सांगलीतील बाळू लोखंडे यांच्या खुर्च्या चांगल्या स्थितीत असून त्यांचा इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये एका कॅफेमध्ये वापर केला जातोय.

बाळू लोखंडे यांच्या खुर्च्यांची एकच चर्चा 

सुनंदन लेले यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओबद्दल सांगितल्यानंतर खुर्च्यांचा हा प्रवास समोर आला आहे. हा मजेदार किस्सा आणि खुर्च्यांचा प्रवास अतिशय रंजक असा आहे. सोशल मीडियावर बाळू लोखंडे यांच्या खुर्च्यांची एकच चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे मी भंगारात घातलेल्या खुर्च्या इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये जाऊन पोहोचतील अशी कल्पानाही मी केली नव्हाती असे लोखंडे सांगत आहेत. तसेच तब्बल तेरा वर्षांच्या खुर्चीने प्रसिद्धी मिळवून दिल्याममुळे ते समाधान व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या :

Video | “अल्लाहसाठी स्त्री-पुरूष समान, मला शाळेत जायचंय” अफगाणिस्तानमधील मुलीचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर लोकप्रिय ठरतोय एक्सेंट चॅलेंज, मिस्टर आणि मिसेस नेनेंचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video | मिक्सर नसताना पुदिन्याची चटनी कशी बनवावी, पाहा हा व्हिडीओ, तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही

(mandap decorators balu lokhande sangli chairs found in england manchester face see viral video)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI