Video | “अल्लाहसाठी स्त्री-पुरूष समान, मला शाळेत जायचंय” अफगाणिस्तानमधील मुलीचा व्हिडीओ व्हायरल

तालिबान्यांच्या धोरणाविरुद्ध अफगाणिस्तानातील काही नागरिक आंदोलन करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या एका मुलीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही मुलगी तालिबान्यांना थेट सवाल करुन मला शाळेत जायचं आहे, असं म्हणत आहे.

Video | "अल्लाहसाठी स्त्री-पुरूष समान, मला शाळेत जायचंय" अफगाणिस्तानमधील मुलीचा व्हिडीओ व्हायरल
AFGHANISTAN GIRL

मुंबई : अफगाणिस्तावर कब्जा करुन तालिबानने आपली सत्ता स्थापन केली आहे. नव्या तालिबान सरकारमध्ये नागरिकांवर अनेक बंधनं टाकण्यात आली आहेत. मुली तसेच महिलांना तर मूलभूत अधिकारांपासून दूर ठेवण्यात आले आहे. तालिबान्यांच्या याच धोरणाविरुद्ध अफगाणिस्तानातील काही नागरिक आंदोलन करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या एका मुलीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही मुलगी तालिबान्यांना थेट सवाल करुन मला शाळेत जायचं आहे, असं म्हणत आहे.

अन्याय, अत्याचाराविरोधात मुलगीचे रोखठोक भाष्य

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ अफगाणिस्तानचे पत्रकार बिलाल सरवरी यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी भाषण करताना दिसत आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात ही मुलगी रोखठोक भाष्य करत आहे. विशेष म्हणजे आम्ही नव्या जगातील मुली असून आम्हाला शिकायचं आहे. आम्हाला घरी बसून राहायचं नाही, असं ही मुलगी सांगत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगी काय म्हणतेय ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी दिसत असून तिच्या आजूबाजूला काही छोट्या मुली उभ्या राहिल्या आहेत. या मुली तालिबानच्या जनताविरोधी कारभारावर भाष्य करणारे बॅनर हातात घेऊन उभ्या आहेत. याच मुलींच्या मधोमध उभे राहून मुलगी भाषण करत आहे. “अल्लाहसमोर स्त्री, पुरुष समान आहेत. मी एका नव्या पिढीतील आहे. फक्त जेवण करुन झोपणे तसेच घरात राहण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. मला शाळेत जायचं आहे. अफगाणिस्तानमध्ये मुलींनी शिक्षण घेतलं नाही तर येणाऱ्या पिढीवर संस्कार कसे होतील,” असे ही मुलगी आपल्या भाषणात सांगताना दिसते.

पाहा व्हिडीओ :

मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, या छोट्या मुलीचे विचार ऐकून नेटकरी प्रभावित झाले आहेत. नेटकरी या मुलाला पाठिंबा देत आहेत. तसेच या मुलीच्या भाषणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

इतर बातम्या :

सोशल मीडियावर लोकप्रिय ठरतोय एक्सेंट चॅलेंज, मिस्टर आणि मिसेस नेनेंचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video | मिक्सर नसताना पुदिन्याची चटनी कशी बनवावी, पाहा हा व्हिडीओ, तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही

Viral : फुड डिलीव्हरी ड्रोनवर कावळ्याचा हवेत हल्ला, पाहा हा व्हायरल व्हिडीओ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI